AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: ट्रम्प यांचा एक इशारा अन् पुन्हा शेअर मार्केटमध्ये खळबळ, नेमकी काय झाली उलथापालथ?

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 30 -शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स 778 अंकांनी वधारून 78,883 अंकांवर उघडला. 50-शेअर असलेला एनएसई निफ्टी 189 अंकांनी वाढून 24,572 अंकांवर उघडला.

Share Market: ट्रम्प यांचा एक इशारा अन् पुन्हा शेअर मार्केटमध्ये खळबळ, नेमकी काय झाली उलथापालथ?
| Updated on: Aug 03, 2026 | 11:34 AM
Share

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 30 -शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स 778 अंकांनी वधारून 78,883 अंकांवर उघडला. 50-शेअर असलेला एनएसई निफ्टी 189 अंकांनी वाढून 24,572 अंकांवर उघडला.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठक आजपासून सुरू होत असून, ती 5 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. परिणामी, गृहकर्ज आणि बँकिंग क्षेत्रात सावधगिरी बाळगली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती आज 6 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 84 डॉलरच्या खाली आल्या. यामुळे इंडिगो, एशियन पेंट्स आणि मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे. याशिवाय, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्सदेखील त्यांच्या दमदार तिमाही निकालांच्या जोरावर बाजाराला आधार देत आहेत.

आज आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून आला. एकीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ला टाळल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत 6-7 टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, टेक आणि एआय स्टॉक्समधील प्रॉफिट-बुकिंग आणि कमकुवत जागतिक भावनांमुळे काही बाजारांवर दबाव आला आहे. जपानचा निक्केई 225 1.79% ने घसरला. टोपीक्समध्येही 1.45% ची घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात कोस्पी 4.75% ने घसरला आणि स्मॉल-कॅप कोस्डॅक 1.67% ने घसरला. हाँगकाँगचा हँग सेंग इंडेक्स 0.1% ने खाली असून तो स्थिर आहे.

ॲमेझॉनच्या प्रभावी तिमाही निकालांच्या जोरावर अमेरिकन शेअर बाजार मागील ट्रेडिंग सत्रात जोरदार वाढीसह बंद झाला आणि आज बाजार उघडण्यापूर्वी स्टॉक फ्युचर्समध्ये वाढ झाली आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजशी संबंधित फ्युचर्स 200 अंकांनी, म्हणजेच 0.4% ने वाढले आहेत. एस अँड पी 500 फ्युचर्स 0.5% ने आणि नॅस्डॅक-100 फ्युचर्स 0.8% ने वाढले. गेल्या आठवड्यात, नॅसडॅक कंपोझिट 1% वाढीसह 25,373.85 अंकांवर बंद झाला, तर एस अँड पी 500 मध्ये 0.7% ची वाढ झाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 276.97 अंकांनी, म्हणजेच 0.53% ने वाढून 52,485.03 अंकांवर बंद झाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही शेअर बाजारातील तेजीशी एक महत्त्वाचा संबंध आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराण युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत. एअर फोर्स वनमधून बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “तेहरानसोबतची चर्चा सोमवारी दुपारी सुरू होणार आहे, मात्र त्यांनी करार करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत दिली नाही. इराणचा अणुकार्यक्रम, होर्मुझची सामुद्रधुनी आणि प्रादेशिक सुरक्षेसंदर्भातील तणाव अजूनही सुटलेला नाही, परंतु पुढील जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी मुत्सद्देगिरी हाच सर्वोत्तम पर्याय आहे.”

Follow Us
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन