iPhone 17 ची तुफान विक्री, Apple कंपनीला लक्ष्मी दर्शन, तोडले सर्व रेकॉर्ड, गुतंवणूकदार मालामाल

Apple Shares Surge : ॲप्पलच्या शेअरमध्ये तुफान आले आहे. आयफोन 17 (iPhone 17) विक्री वाढल्याने शेअर बाजारात चैतन्य आले आहेत. सोमवारी हा शेअर 4.2 टक्क्यांनी उसळी घेऊन 262.9 डॉलरपर्यंत पोहचला आहे.

iPhone 17 ची तुफान विक्री, Apple कंपनीला लक्ष्मी दर्शन, तोडले सर्व रेकॉर्ड, गुतंवणूकदार मालामाल
आयफोन 17
| Updated on: Oct 21, 2025 | 4:52 PM

आयफोन तयार करणारी कंपनी ॲप्पलच्या (Apple) शेअरमध्ये सोमवारी मोठे तुफान आले. हा शेअर त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. यासह कंपनीचे मूल्य 4 ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास 4 लाख कोटींच्या घरात पोहचला. ॲप्पलच्या शेअरमध्ये तुफान आले आहे. आयफोन 17 (iPhone 17) विक्री वाढल्याने शेअर बाजारात चैतन्य आले आहेत. सोमवारी हा शेअर 4.2 टक्क्यांनी उसळी घेऊन 262.9 डॉलरपर्यंत पोहचला आहे. यासह ॲप्पल जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप वाढले आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी एनव्हिडियाचे (Nvidia) मार्केट कॅप त्यापेक्षा अधिक आहे.

Apple चा आलेख चढताच

रिसर्च फर्म काऊंटरपॉईंटनुसार iPhone 17 ने चीन आणि अमेरिकामध्ये पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी बजावली. दोन्ही देशांमध्ये सुरुवातीच्या 10 दिवसांमध्ये iPhone 16 सीरीजच्या तुलनेत आयफोन 17 मध्ये 14 टक्क्यांहून अधिकची विक्री केली आहे. अजून ही कंपनी जोरदार कामगिरी करण्याची शक्यता आहे.

मार्केट रिसर्च फर्म एवरकोर आयएसआयने (Evercore ISI) या शेअरला त्यांच्या टेक्निकल आऊटपरफॉर्म यादीत जोडले आहेत. या ब्रोकरेज हाऊस नुसार, ॲप्पल येत्या तीन महिन्यात बाजारात अधिक जोरदार मुसंडी मारेल. डिसेंबरच्या तिमाहीत ॲप्पलचे निकाल एकदम चांगले असतील. सध्या तरी आयफोन 17 गारुड लवकर उतरण्याची शक्यता कमीच आहे. हा शेअर अजून वधारण्याची शक्यता आहे. अजूनही अनेक भागात ॲप्पलच्या आयफोनची डिलिव्हरी झालेली नाही. ही खेप लवकरच पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर तेजीत राहू शकतो.

ॲप्पलला टॅरिफचा मोठा फटका

ॲप्पल कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयफोनची अपग्रेडेट सीरीज बाजारात उतरवली. टॅरिफची भीती पाहता कंपनीने किंमतीत मोठा बदल केला नाही. त्याचा परिणाम लागलीच विक्रीत दिसला. सुरुवातीला ॲप्पलचा शेअर दबावात होता. अमेरिकन टॅरिफ धोरणाचा तो परिणाम होता. अमेरिकाने चीनवर टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. चीन हे ॲप्पलचे एक मोठे उत्पादन केंद्र आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी दिसली. पण आता आयफोन 17 ची दमदार विक्री होत असल्याने ॲप्पलच्या शेअरमध्ये तुफान आले आहे. हा शेअर येत्या डिसेंबर 2025 पर्यंत मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. टॅरिफची समस्या दूर झाल्यास कंपनीचा शेअर सुसाट धावण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.