रुपया सावरला, कच्चे तेलही नरमले! अर्थसंकल्पाआधी देशाच्या अर्थव्यवस्थेला ‘डबल बूस्टर’; महागाई नियंत्रणात ठेवण्यासही मदत
ब्रेंट क्रूडच्या किमती ९० डॉलर्सच्या खाली येणे आणि त्याच वेळी रुपया अधिक मजबूत होणे, या गोष्टी भारतासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि चलन मजबूत झाल्यामुळे आयात खर्च कमी होऊ शकतो, तसेच महागाईवर नियंत्रण मिळवण्यासही मदत होऊ शकते.

अखेरीस महागाईला आळा बसू शकतो. भारतासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक फायद्यांचे दरवाजे उघडताना दिसत आहेत ज्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, कच्च्या तेलाचा पुरवठा वाढल्यामुळे आणि बाजारात अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता असल्याने, ‘ब्रेंट क्रूड’च्या किमती प्रति बॅरल ९० डॉलर्सच्या खाली आल्या आहेत. ही घसरण गेल्या तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. दुसरे कारण म्हणजे, भारतीय रुपया मजबूत होऊ लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात, कच्च्या तेलाच्या किमतीत २७ टक्क्यांपर्यंत घट झाली असताना, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य २.५ टक्क्यांनी वाढले आहे.
एका तज्ञांनी रॉयटर्सला सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपया ९१.५० च्या पातळीपर्यंत मजबूत होऊ शकतो. HDFC बँकेचे ‘ग्रुप हेड ऑफ ट्रेझरी’ अरूप रक्षित यांनी ‘ईटी’ (ET) च्या वृत्तानुसार सांगितले की त्यांना वाटतं की, १.५० ची पातळी गाठणे शक्य आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, नजीकच्या काळात रुपया ९१.५० ते ९३.५० च्या दरम्यान व्यवहार करू शकतो.
महागाई वाढली
गेल्या काही महिन्यांपासून ऊर्जेचा उच्च खर्च आणि रुपयातील कमकुवतपणा यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर दबाव आला आहे. याच्या परिणामी महागाई वाढली आहे आणि वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. जर या परिस्थितीमध्ये सुधारणा नाही झाली तर महागाईचा फटका बसेल. पण यात जर प्रगती झाली होत राहिली, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळू शकेल. गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या कमाईत सुधारणा दिसून येईल, व्यवसायांना कमी खर्चामुळे फायदा होईल आणि सामान्य ग्राहकांनाही वाढत्या महागाईपासून काहीसा दिलासा मिळू शकेल.
२०२७-२८ च्या अर्थसंकल्पात काय होणार?
२०२७-२८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक भार हलका होतो, ज्यामुळे सरकारी हस्तक्षेपाची गरज कमी होऊ शकते. यामुळे खत अनुदानावरील खर्च नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि सरकारी तिजोरीवरील ताणही कमी होतो. परिणामी, ऊर्जेशी संबंधित अचानक उद्भवणाऱ्या मोठ्या खर्चांची चिंता न करता, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी सरकारकडे अधिक लवचिकता असेल.
तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे डॉलरची मागणी घटते, तर परकीय गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे डॉलरचा पुरवठा वाढतो. या सर्व घटकांमुळे रुपया अचानक येणाऱ्या धक्क्यांपासून अधिक सुरक्षित होऊ शकतो.