AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump Tariff Plan : भारताला ज्याची भीती तोच निर्णय घेण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प, डझनभर देश संकटात, थेट..

Donald Trump New Tariff Plan : अमेरिका टॅरिफबद्दल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेची वाट अगोदरच लागली आहे. प्रचंड महागाई वाढली आहे. त्याचा जागतिक बाजारावर परिणाम होताना दिसत आहे. त्यातच आता कोणत्याही क्षणी अमेरिकेकडून मोठी घोषणा केली जाऊ शकते.

Donald Trump Tariff Plan : भारताला ज्याची भीती तोच निर्णय घेण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प, डझनभर देश संकटात, थेट..
Donald Trump
| Updated on: Nov 25, 2026 | 7:02 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकताच डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर होते. यादरम्यान चीन, अमेरिका आणि रशियात व्दिपक्षीय चर्चा झाली. जागतिक तीन शक्ती एकत्र आल्या. रशिया आणि अमेरिका यांच्यात अनेक विषयात मतभेद आहेत. भविष्यात एकत्र येत काम करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे. त्यातच आता मोठ्या घडानोडी घडताना दिसत आहे. अमेरिका भारतासह डझनभर देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. चीन भारतासह अन्य देशांच्या यात समावेश आहे. ज्या देशांवर अगोदरच टॅरिफ आहे, तो वाढवला जाणार आहे. पुन्हा एकदा अमेरिकेने जगाचे टेन्शन वाढवले. अमेरिकेत प्रचंड महागाई वाढली आहे. ज्याचा परिणाम होताना दिसत आहे. आता इतर देशांना नाकीनऊ आणण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून केला जाणार आहे. अंतिम निर्णय लवकरच घेताला जाईल.

जागतिक व्यापारात मोठा धक्का देण्याची तयारी अमेरिकेकडून केली जात आहे. प्रमुख आणि मोठ्या देसांवर शुल्क आकारण्याच्या तयारीत अमेरिका आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर या आठवड्यात यासंदर्भातील आपले निष्कर्ष जाहीर करणार आहेत. चीन, युरोपियन युनियन यांच्यासह 14 देश आपल्या देशांतर्गत उद्योगांना सरकारी अनुदान आणि मदत देतात असा दावा अमेरिकेच्या अहवालात करण्यात आला.

जेमिसन ग्रीर यांच्या मते, सरकारी मदतीमुळे संबंधित देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन क्षमता निर्माण झाली. त्यामुळे बाजारपेठांमधील कंपन्या जगभरात कमी किंमतीत मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार करतात. या कंपन्या जगभरात अत्यंत कमी किंमतीत मोठ्या प्रमाणावर माल विकत आहे.याचा परिणाम थेट अमेरिकन उत्पादकांना सहन करावा लागतो.

टॅरिफ वाढवण्याबाबत विचार केला जात आहे.यावर ट्रम्प प्रशासन लवकरच निर्णय घेईल. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका इतर काही देशांना बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. या नवीन टॅरिफचे संकट भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन युनियनच्या सर्व 27 सदस्य देशांसह डझनभर देशांवर आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी