AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar: जतला पाणी मिळाल्यानंतर जयंत पाटील यांची चीनमध्ये बसून फोनाफोनी, गोपीचंद पडखळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar on Jayant Patil: जत मधील पाणी पाहून चीन मध्ये बसलेल्या जयंत पाटलांचा डोकं पिसाळलं अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. यामुळे सांगलीतील वातावरण तापलं आहे. राजकीय श्रेयवाद रंगला आहे. काय म्हणाले पडळकर?

Gopichand Padalkar: जतला पाणी मिळाल्यानंतर जयंत पाटील यांची चीनमध्ये बसून फोनाफोनी, गोपीचंद पडखळकरांचा हल्लाबोल
जतला पाणी मिळाल्यानंतर जयंत पाटील यांची चीनमध्ये बसून फोनाफोनी, गोपीचंद पडखळकरांचा हल्लाबोल
| Updated on: Nov 25, 2026 | 6:35 AM
Share

Gopichand Padalkar on Jayant Patil: जतमध्ये पाणी दाखल झाल्यावर चीनमध्ये बसलेले जयंत पाटलांचे डोकं पिसाळले होतं, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केली आहे.सांगलीच्या जत तालुक्यातल्या कुलाळवाडी येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. दोघांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात विस्तवही जात नाही हे अनेकदा समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर पडळकर यांनी मंचावरूनच पाटील यांना मोठा टोला लगावला होता. तर आता जतच्या पाणी प्रश्नावरून राजकीय श्रेयवाद रंगला आहे.

जतमध्ये पहिल्यांदाच पाणी आलं आहे का ?

काही दिवसांपूर्वी जत तालुक्यातल्या गुड्डापुर तलावामध्ये आपल्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले,त्याचा व्हिडिओ पाहून चीनमध्ये बसलेल्या जयंत पाटलांचा डोकं पिसाळलं, जतमध्ये पहिल्यांदाच पाणी आलं आहे का ? असं ते फोनवरून सांगत होते,असा टोला गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे.तसेच पुढील वर्षभरात शेतकऱ्यांच्या प्रत्येक बांधावर पाणी घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आपली सोशल मीडियावर जोरदार हवा

आपली सोशल मीडियावर जोरदार हवा आहे, असे म्हणत पडळकर यांनी विरोधकांना पुन्हा एकदा जोरदार टोला लगावला. जत तालुक्यातील गावामध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर जत तालुक्यातील वाढत्या बालविवाहावर त्यांनी चिंता व्यक्त केली. मुलींचे बालविवाह न करण्याचे आवाहन त्यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

दुष्काळी भागात पाण्याचा पाट

दुष्काळी जत तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच कुलाळवाडी, अंकलगी आणि राजोबाचीवाडी या गावांच्या दिशेने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. याभागात पाणी पोहचल्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते त्याचे पूजन करून आवर्तनाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी जत मध्ये पाणी दाखल झाल्यावर चीनमध्ये बसलेले जयंत पाटलांचे डोकं पिसाळले होतं, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केली.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी