वय अवघं 23, स्वत:च्या मेहनतीवर लाखो कमवले, हा तरुण आहे नेमका कोण?

| Updated on: Feb 10, 2021 | 8:58 PM

हर्ष केडिया प्रसिद्ध होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याने मार्केटमध्ये आणलेली शूगर फ्री चॉकलेट! (Success Story of Harsh Kedia)

वय अवघं 23, स्वत:च्या मेहनतीवर लाखो कमवले, हा तरुण आहे नेमका कोण?
Follow us on

मुंबई : कोणत्याही व्यवसायाला समृद्ध किंवा मोठा होण्यासाठी त्या व्यवसायाला योग्य वेळ द्यावा लागतो. कारण अनेक दिवस सातत्याने मेहनत करत राहिल्यानंतर यश मिळतं, असं म्हटलं जातं. मात्र, हर्ष केडिया या तरुणासोबत असं घडलं नाही. तो चॉकलेट मार्केटमध्ये आला, लढला आणि त्याने जिंकून घेतलं. त्याचं वय अवघं 24 वर्ष, पण त्याचं कर्तृत्व चांगल्या उद्योजकांनाही लाजवेल असं आहे. म्हणूनच त्याचं ‘फोर्ब्स’च्या 30 अंडर 30 लिस्टमध्ये नाव आलंय (Success Story of Harsh Kedia).

हर्ष केडिया प्रसिद्ध होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याने मार्केटमध्ये आणलेली शूगर फ्री चॉकलेट! त्याने बाजारात मधुमेहग्रस्तांसाठी चॉकलेट आणली. या चॉकलेटला बाजारात ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे तो आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. तो सध्या एक लेखक आणि डायबिटीक शेफ म्हणून प्रसिद्ध आहे (Success Story of Harsh Kedia).

हर्ष केडिया याच्या संघर्षाबाबत सांगालयचं झालं तर, तो कमी वयात मधुमेहग्रस्त झाला. मात्र, या आजाराला त्याने जुमानलं नाही. त्याला या आजारावरुनच व्यवसायाची कल्पना सुचली. त्याची ही कल्पना इतकी यशस्वी ठरली की, आज तो त्याच कल्पनेमुळे जगप्रसिद्ध ठरला आहे.

हर्षने मधुमेहग्रस्तांसाठी चॉकलेट बनवण्याचा निर्णय घेतला. या चॉकलेटची चव अगदी ओरिजनल चॉकलेटसारखी असावी आणि त्यामुळे शरीरातील साखरही वाढणार नाही, अशी चॉकलेट तयार करण्याचं त्याने ठरवलं. त्याने जिद्द आणि चिकाटीने तशी चॉकलेट शेवटी बनवून दाखवली. त्याच्या या चॉकलेटला आज बाजारात चांगली मागणी आहे. त्याने बनवलेले डायबिटीक फ्रेंडली चॉकलेट, हॉट चॉकलेट, ब्राऊनी असे अनेक खाद्यपदार्थ जगप्रसिद्ध आहेत.

फोर्ब्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार हर्ष केडियाचं व्यवसायिक टर्नओव्हर हे सध्या 52-55 लाख रुपये इतकं आहे. मधुमेहग्रस्तांसाठी चॉकलेट बनवता यावी, यासाठी तो गेल्या सात वर्षांपासून काम करत होता. त्याला या कामात यश आलं आणि आज तो जगप्रसिद्ध झाला.

हेही वाचा : आधी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट, नंतर बैलगाडीतून येऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार, नाना पटोले कामाला लागले