AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट, नंतर बैलगाडीतून येऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार, नाना पटोले कामाला लागले

महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Nana Patole Maharashtra Congress President Post)

आधी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट, नंतर बैलगाडीतून येऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार, नाना पटोले कामाला लागले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
| Updated on: Feb 11, 2021 | 12:02 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे येत्या शुक्रवारी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. येत्या शुक्रवारी 12 फेब्रुवारीला ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात हा कार्यक्रमात पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Nana Patole Will Take In Charge on Maharashtra Congress President Post)

प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी शुक्रवारी नाना पटोले सकाळी मंत्रालयाजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करतील. त्यानंतर हुतात्मा चौकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना वंदन करतील. यानंतर पटोले दक्षिण मुंबई आणि विधानभवनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टरने प्रवास करुन गिरगाव चौपाटीला पोहोचतील.

या ठिकाणी असणाऱ्या लोकमान्य टिळक आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर इंधन दरवाढ आणि वाढती महागाई या ज्वलंत प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरगाव चौपटी ते ऑगस्ट क्रांती मैदान हा प्रवास बैलगाडीने करतील.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तसेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, मंत्रीमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल उपस्थित असणार आहे. तसेच काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेल आणि फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान गुरुवारी 11 फेब्रुवारीला नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुंबईतील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट देणार आहेत. सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, माहिम दर्गा, माहिम चर्च, शिवाजी पार्क, दादर गुरुद्वारा येथे जाऊन अभिवादन करतील. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.  (Nana Patole Will Take In Charge on Maharashtra Congress President Post)

संबंधित बातम्या : 

पक्षानं आदेश दिल्यास नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढणार, नाना पटोलेंचे थेट आव्हान

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले नागपुरातील घरी, मातोश्रींकडून औक्षणाने स्वागत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.