काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले नागपुरातील घरी, मातोश्रींकडून औक्षणाने स्वागत

नाना पटोलेंचं नागपुरात काँग्रेसकडून जंगी स्वागत करण्यात आलं. (Nana Patole mother Nagpur)

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले नागपुरातील घरी, मातोश्रींकडून औक्षणाने स्वागत
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 3:05 PM

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पहिल्यांदाच होमग्राऊण्डवर गेले. नागपुरातील घरी जाऊन नाना पटोलेंनी मातोश्रींचा आशिर्वाद घेतला. यावेळी नानांच्या माऊलीने त्यांचे औक्षण करुन स्वागत केले. या क्षणी मायलेक काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. (Nana Patole receives blessings from mother at Nagpur Residence)

नाना पटोले यांचं दिल्लीहून सकाळी 11 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळावरुन दीक्षाभूमी, टेकडी गणेश मंदिर आणि ताजबागला पटोलेंनी भेट दिली.

“नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं”

नाना पटोलेंनी दीक्षाभूमीवर जाऊन वंदन केलं. जनतेला भाजप विरोधात उभं करण्याची प्रेरणा या दीक्षाभूमीतून घेऊन जात असल्याचं यावेळी पटोले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही, अशा शब्दात पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

‘काँग्रेसमध्ये गटबाजी दिसणार नाही’

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत बोलताना आपल्याला हायकमांडनं ऊर्जा देण्याचं काम केलं. ही ऊर्जा पुढे नेण्याचं काम आता करणार असल्याचं सांगितलं. नाना पटोले यांना मंत्रिपद मिळण्याबाबतही चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना नाना पटोलेंचा खुर्चीचा विषय नाही. त्यामुळे ते सोडून बोला, असं ते म्हणाले. नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? हे हायकमांड ठरवेल. आता काँग्रेसमध्ये गटबाजी दिसणार नाही, असा दावाही यावेळी पटोलेंनी केला. (Nana Patole receives blessings from mother at Nagpur Residence)

नाना पटोले फक्त प्रदेशाध्यक्षच?

नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होणारच होते. ते झालेही पण त्यांनी सोबत मंत्रिपदाचीही मागणी केली आणि काँग्रेसमध्येच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. आताही पटोलेंना मंत्रीपद मिळणार की नाही याची चर्चाच सुरु आहे. राऊत, पटोले एकत्र सोनियांना भेटले म्हणून राऊतांचं ऊर्जा खातं पटोलेंना मिळणार अशीही चर्चा सुरु आहे.

आता संग्राम थोपटेंच्या नावामुळे पटोले फक्त प्रदेशाध्यक्षच रहातील आणि त्यांनी पक्षविस्तारासाठी पूर्ण वेळ द्यावा असं काँग्रेस हायकमांडला अपेक्षित असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यातच राऊत ऊर्जा खातं सहज सोडतील अशी शक्यताही कमी आहे. पटोलेंसाठी ऊर्जा खातं सोडलं तर मग राऊत सभाध्यक्ष होणार का? अशीही काँग्रेस गोटात चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या :

मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, नाना पटोलेंचा दिल्लीत निर्धार

पंतप्रधान मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू दिसत नाहीत का? नाना पटोले आक्रमक

(Nana Patole receives blessings from mother at Nagpur Residence)

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.