Sugar export : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय साखरेला मोठी मागणी; निर्यात दुपटीने वाढली

| Updated on: Mar 19, 2022 | 5:40 AM

जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेची मागणी (Indian Sugar in demand) वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. साखरेची मागणी वाढल्याने निर्यात (Export) दुपटीने वाढली आहे. भारतीय साखरेची निर्यात पाहाता ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत विक्रमी निर्यात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Sugar export : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय साखरेला मोठी मागणी; निर्यात दुपटीने वाढली
Follow us on

मुंबई : जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेची मागणी (Indian Sugar in demand) वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. साखरेची मागणी वाढल्याने निर्यात (Export) दुपटीने वाढली आहे. भारतीय साखरेची निर्यात पाहाता ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत विक्रमी निर्यात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून ते या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकूण 47 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर 65 लाख टन साखरेचे कॉट्रॅक्ट मिळाले आहे. 2020 – 2021 मध्ये एकूण 17.75 टन साखरेची निर्णयात करण्यात आली होती. तर चालू वर्षात फेब्रुवारी (February) महिन्यापर्यंतच 47 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. याचाच अर्थ साखरेच्या निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. इस्माच्या रिपोर्टनुसार यंदा साखर निर्यातीचा आकडा 75 लाख टनाचा टप्पा ओलांडू शकतो. ही एक विक्रमी साखर निर्यात असेल.

2.83 कोटी टन साखरेचे उत्पादन

चालू हंगामात 15 मार्चपर्यंत साखरेचे एकूण 2.83 कोटी टन उत्पन्न झाले आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नऊ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी 2.59 टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू वर्षात देशात साखरेची एकूण आवश्यकता 2.72 कोटी टनापर्यंत राहू शकते. तर उत्पादन 3.33 कोटी टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. देशाची गरज भगून शिल्लक राहिलेली साखर विकण्याची मोठी संधी यावेळी भारताकडे असणार आहे.

इथेनॉलमुळे साखरेचे प्रमाण घटले

भारतासोबतच अनेक देश आता ऊसापासून इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत. त्यामुळे जागतिक स्थरावर साखर उत्पादनात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. भारतात अद्यापही म्हणावी तेवढी ऊसापासून इथेनॉल निर्मिती होत नसल्याने साखर उत्पादनाचे प्रमाण अधिक आहे. गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते. आयात निर्यात ठप्प झाली होती. पुरवठा साखळी खंडीत झाली होती. त्याचा फटका निर्यातीला बसल्याने निर्यातीत घट झाली. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्यातीत तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

IDBI बँकेच्या ‘या’ योजनेत मिळवा दुहेरी फायदा, चांगल्या परताव्यासोबतच टॅक्सची बचत

Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला

Hurun Global Rich List 2022 : मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, अदानींच्या संपत्तीत विक्रमी वाढ