AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला

2150 रुपयांचा इश्यु प्राईस असलेला पेटीएमचा आयपीओ 72 टक्क्यांनी घसरुन लोळला आहे. याचा सरळ अर्थ गुंतवणुकादारांनी लावलेल्या 100 रुपयांतील केवळ 28 रुपये वाचले आहेत. तेही किती दिवस वाचतील हा ही एक यक्ष प्रश्न आहे. आयपीओ बाजारात दाखल झाला तेव्हाही गुंतवणुकादारांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला नाही.

Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला
पेटीएम आयपीओ
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 8:31 AM
Share

देशातील सर्वात मोठा आयपीओ, सर्वाधिक गतीने झेप घेणारी फिनटेक कंपनी, भारताच्या दमदार नव उद्योगांचा चेहरा, डिजिटल पेमेंट कंपनी अशा विविध प्रकारे (Paytm) कंपनीच्या आयपीओची जाहिरात करण्यात आली होती. मात्र आता  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank Of india) शंका येण्या इतपत परिस्थितीत बिघडली आहे. आयपीओ बाजारात दाखल होत असताना पेटीएमचे कौतूक काही केल्या थांबत नव्हते. त्यामुळे पेटीएमबाबत  साशंक असलेले गुंतवणूकदार ही आपसूकच या आयपीओकडे वळाले. पण आता त्यांचा पैसा पाण्यात गेला आहे आणि त्यांना फसविल्याची जाणीव गुंतवणुकदारांना सलत आहे. 2150 रुपयांचा इश्यु प्राईस (Issue Price) असलेला पेटीएमचा इश्यु प्राईस 72 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचे हे लोटांगण गुंतवणकुदारांसाठी चिंतेची बाब आहे. कारण त्यांच्या 100 रुपयांतील 72 रुपये बुडाले तर उर्वरीत 28 रुपये पण किती दिवस वाचतील याचा गुंतवणुकदारांना भरवसा राहिलेला नाही.

पहिल्याच दिवशी 26 टक्क्यांनी नुकसान

त्यावेळी येणारा प्रत्येक आयपीओ गुंतवणुकदारांनी डोक्यावर घेतला होता. त्यात प्रचंड गुंतवणूक झाली होती. परंतु, पेटीएमविषयी गुंतवणुकदारांच्या मनात साशंकता होती. पेटीएमचा आयपीओ दुप्पटीतही नोंद झाला नाही. मोठ्या वित्त संस्था या आयपीओपासून दोन हात दूर होत्या. परंतु, किरकोळ ग्राहकांनी, गुंतवणुकदारांनी पेटीएम निदान काही तरी नफा तर देईल या आशेने मोठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे पेटीएमचे नशीब फळफळले. परंतु, शेअर बाजारात सूचीबद्ध होताच, पहिल्याच दिवशी पेटीएमचा आयपीओने 25 टक्क्यांच्याही खाली राहिला. हा शेअर 1586 रुपयांवर येऊन थांबला. ग्लोबल ब्रोकरेज कंपनी मैक्वायरी यांनी पेटीएमच्या व्यावसायिक पद्धती व नियोजनावर सडकून टिका केली. हे बिझनेस मॉडेल दिशाहीन असल्याचा आरोप केला. तसेच हा आयपीओ 1200 रुपयांपर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तविला होता.

गुंतवणूकदारांचे नुकसान

पहिल्याच दिवशी एक पावची हापकी खाललेल्या पेटीएमची भविष्यातील वाटचाल कशी असेल याचा अंदाज आलेल्या काही गुंतवणुकदारांनी नफा जाऊ द्या पण कमी फटका बसेल म्हणून काढता पाय घेतला, ते नशीबवान ठरले. कारण त्यांचे फार मोठे नुकसान झाले नाही. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. ते सपशेल बुडाले. कारण मंगळवारी पेटीएमचा शेअर 584 रुपयांवर घसरला.

केवायसी नियम धाब्यावर

पेटीएमसाठी आणखी वाईट काळ येणार हे गुंतवणुकादारांना अगोदरच माहित होते. आणि गेल्या शुक्रवारी त्याची सुरुवात झाली. रिझर्व्ह बँकेला पेटीएमच्या व्यवहाराबाबत साशंकता होतीच. त्यांनी कंपनीला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली. तसेच लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले. पेटीएमवर मनी लॉड्रिंगसारखा गंभीर आरोप आहे. तसेच केवायसी नियमांना हरताळ फासल्याने कंपनीभोवती कारवाईचा फास आवळण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Hurun Global Rich List 2022 : मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, अदानींच्या संपत्तीत विक्रमी वाढ

20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेंन्सेक्स 900 अकांनी उसळला, गुंतवणूकदारांचा 7.5 लाख कोटींचा फायदा

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान