गुंतवणूकदार मालामाल; 70 टक्के IPO मधून मिळाला चांगला परतावा

गुंतवणूकदार मालामाल; 70 टक्के IPO मधून मिळाला चांगला परतावा
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: file

2021 मध्ये एकूण 7 स्टार्ट-अप सुरु झाले होते. त्यातील 3 स्टार्टअप्सच्या आयपीओंनी पैसा कमविला आणि अद्यापही यामध्ये पैसा कमाविण्याची संधी मिळत आहे. यामध्ये Easy Trip Planners सर्वात आघाडीवर आहे. या कंपनीने 51 टक्के परतावा दिला आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Mar 17, 2022 | 9:21 AM

रशिया-युक्रेन युद्धाने शेअर बाजारावर मंदीचे सावट आले होते. घसरणीमुळे गुंतवणुकदार कोमात आहेत. तर दुसरीकडे आयपीओमध्ये पण शांतता आहे. 2022 च्या सुरुवातीला शेअर बाजाराने नवनवे उच्चांक प्रस्थापित केले होते. पण त्यानंतर शेअर बाजारावर संकटे येत गेली. सध्या निफ्टीत 6 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर 2021 मध्ये सुचीबद्ध झालेले आयपीओतील 70 टक्के आयपीओ (IPO)आजही नफा देत आहेत. 2021 मध्ये एकूण 66 आयपीओ सुचीबद्ध झाली होती. त्यातील 43 कंपन्यामध्ये आजपण नफ्याचे गणित जुळवून येत आहे. तर 23 असे आयपीओ आहेत, ज्याठिकाणी गुंतवणुकदार (Investors) हवालदिल झाले आहेत. त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. सुचीबद्ध 23 कंपन्यांमध्ये 4 कंपन्या नव्या दमाच्या (Start-Ups) आहेत. गुंतवणुकदारांचा विश्वास तोडणा-या आणि त्यांना फटका देणा-या कंपन्यांमध्ये सर्वात आघाडीवर paytm आहे, कंपनीच्या आयपीओ मध्ये 71 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर दुस-या क्रमांकावर आहे cartrade, ज्यामध्ये गुंतवणुकदारांची 66 टक्के गुंतवणूक पाण्यात गेली आहे. Fino Payment Bank मध्ये जवळपास 51 टक्के तर PB Fintech त्यांच्या इश्यु प्राईसपेक्षा 31 टक्के खाली घसरली आहे.

स्टार्ट अप कंपन्या फायद्यात

सर्वच नव्या दमाच्या कंपन्यांमधील गुंतवणुकदारांचे हात पोळले असे नाही. 2021 मधील एकूण 7 स्टार्ट-अप्समधील 3 स्टार्ट अप्सच्या आयपीओंनी गुंतवणुकदारांना मालामाल ही केले आहे. यामध्ये Easy Trip Planners सर्वात आघाडीवर आहे. या कंपनीने 51 टक्के परतावा दिला आहे. तर दुस-या क्रमांकावर Nykaa चा क्रमांक लागतो. गेल्या 52 हप्त्यात 45 टक्के घसरणीनंतरही हा आयपीओ 1125 रुपयांवर, त्याच्या इश्यु प्राईसपेक्षा 25 टक्के जास्त आहे. Zomato मध्ये घसरण दिसून आली असली तरी कंपनी इश्य प्राईसपेक्षा 2 टक्के अधिकचा परतावा देत आहे.

या कंपन्यांनी ग्राहकांचे खिशे भरले

दरम्यान 43 असे आयपीओ आहेत त्यांनी ग्राहकांच्या खिशात रग्गड पैसे कोंबले. यामध्ये Laxmi Organic, MTAR Tech, Nureca Limited और Paras Defence यांच्या समावेश आहे. या कंपन्यांनी गुंतवणुकदारांना त्यांच्या इश्यु प्राईस पेक्षा 3 पटीहून अधिकचा नफा मिळवून दिला. तर सर्वात कमाल केली आहे ती, Paras Defence या कंपनीने. या कंपनीच्या आयपीओने इश्यु प्राईसपेक्षा सव्वा सात टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा आयपीओ 52 आठवड्यांच्या उच्चांकीस्तरावर 1272 रुपये इतका आहे.

संबंधित बातम्या

31 मार्चच्या आत पटापट पूर्ण करा बँकेशी संबंधित ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Russia Ukraine Crisis : युद्धाचा सर्वाधिक फटका अशिया खंडात भारताला बसणार, S&P ग्लोबल रेटिंग्सचा अंदाज

‘Net Neutrality’ चा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेट न्यूट्रेलिटी म्हणजे नेमकं काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें