AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 मार्चच्या आत पटापट पूर्ण करा बँकेशी संबंधित ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका

मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. मार्च महिन्यात बँकिंग तसेच इतर आर्थिक बाबींसंदर्भातील सर्व महत्त्वापूर्ण कामे पार पाडावी लागतात. अन्यथा नंतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आज आपण अशाच काही कामांची यादी पहाणार आहोत.

31 मार्चच्या आत पटापट पूर्ण करा बँकेशी संबंधित 'ही' कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 8:16 AM
Share

मुंबई : मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. मार्च महिन्यात बँकिंग तसेच इतर आर्थिक बाबींसंदर्भातील सर्व महत्त्वापूर्ण कामे पार पाडावी लागतात. अन्यथा नंतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आज आपण अशाच काही कामांची यादी पहाणार आहोत. जी कामे तुम्हाला 31 मार्चच्या आधी करावी लागणार आहेत. जर तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आपली नोकरी बदलली आहे किंवा नवीन जॉबला सुरुवात केली आहे, तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नासंबंधिची माहिती फॉर्म 12B (Form-12B) मध्ये भरून तुमच्या कंपनीकडे सादर करणे बंधनकारक असते. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा टीडीएस (TDS) योग्यप्रमाणात कट होईल. आयकर कायद (Income Tax Act) कलम 208 नुसार जर तुम्ही दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक टॅक्स जमा करत असाल तर तुम्ही हफ्त्यांनी देखील कराचा भरणा करू शकता. एकूण चार हफ्त्यांमध्ये आयकर जमा करायचा असतो. तुम्ही जर चौथा हफ्ता भरला नसेल तर तुम्ही 31 मार्चपर्यंत चौथा हफ्ता भरू शकता.

बँकिंग केवायसी अपडेट करा

बँकिंग केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तुम्हालाही जर बँकिंग केवायसी अपडेट करायची असेल तर तुम्ही 31 मार्चपर्यंत बँकिंग केवायसी अपडेट करू शकता. ज्यामध्ये बँकेत तुमचा रहिवासी पुरावा सादर करणे, अपडेट पॅक कार्ड किंवा आधार कार्ड सादर करणे किंवा इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सादर करणे या कामांचा समावेश होतो. केवायसीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तुम्ही 31 मार्चपर्यंत बँकिंग केवायसी अपडेट करू शकत. त्यानंतर कदाचीत तुमच्याकडून दंड आकारण्यात येऊ शकतो.

आधार पॅन लिंकिंग

तुम्ही अजूनही जर आधार कार्डला पॅन (PAN) कार्ड लिंक केले नसेल तर, 31 मार्चच्या आत तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक (PAN-Aadhaar link) करू घ्या. 31 मार्च ही आधार – पॅन लिंकिंगसाठी अंतिम तारीख आहे. जर तुम्ही 31 मार्चनंतर देखील आधारला पॅन लिंक न केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. तुम्हाला टीडीएस (TDS) तर भरावा लागेलच सोबतच तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. बँकिंग सेवांचा लाभ देखील घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपले पॅन आधारला लिंक आहे का? ते आधी चेक करून घ्या, नसेल लिंक केले तर आजच आपले पॅन आधारला लिंक करा. आर्थिक गौरव्यवहारांना आळा घालण्यासाठी पॅन आणि आधार लिंकिंग सक्तीचे करण्यात आले आहे. यापूर्वी कोरोनामुळे आधार आणि पॅन लिंकिंगसाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 मार्चपर्यंत आधारला-पॅन लिंक करता येणार आहे.

संबंधित बातम्या

Russia Ukraine Crisis : युद्धाचा सर्वाधिक फटका अशिया खंडात भारताला बसणार, S&P ग्लोबल रेटिंग्सचा अंदाज

‘Net Neutrality’ चा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेट न्यूट्रेलिटी म्हणजे नेमकं काय?

Home loan : घराचा हप्ता थकल्यास काय करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.