20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

साधारणपणे होमलोन दीर्घकालावधीसाठी असते. ईएमआयच्या रुपात बँका सुरुवातीला व्याजाची रक्कम कपात करतात. मात्र जर तुम्ही स्मार्टपणे नियोजन केल्यास कमीत कमी काळात कर्जमुक्त होऊ शकता. त्यासाठी काय करता येईल जाणून घेऊयात.

20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
20 वर्षांचे कर्ज दहा वर्षांत कसे फेडाल?
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 5:30 AM

नागपुरातील एका कंपनीत काम करणाऱ्या रवीनं 20 लाख रुपयांचं कर्ज (Home loan) घेऊन घर (House) खरेदी केलं होतं. त्यासाठी त्यानं सात टक्के व्याज दरानं 20 वर्षांसाठी होम लोन घेतलंय रवीला दर महिन्याला 16111 रुपयांचा होम लोनचा हप्ता भरावा लागतोय. कोरोनाचा (Corona) कहर कमी झाल्यानं रवीचा पगार वाढलेला आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर होमलोनमधून मुक्त व्हायचं आहे. होम लोन लवकरात लवकर परतफेड करण्यासाठी रवीकडे कोणता पर्याय आहे पाहूयात. पर्याय पहिला, दरवर्षी जास्तीचा एक ईएमआय भरण्याचा. जर रवीनं दर वर्षी फक्त एक ईएमआय जास्तीचा भरल्यास 20 वर्षांत मूळ कर्जासोबत 18. 24 लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. मात्र दरवर्षी जास्तीचा एक ईएमआय भरल्यास त्याचा ईएमआय 240 महिन्यांवरून 207 महिन्यांवर येईल. अशाप्रकारे होम लोनची परतफेड 33 महिने लवकर पूर्ण होईल, सोबतच 2.55 लाख रुपये व्याजाची रक्कम वाचेल.

ईएमआयचा हप्ता वाढवून घ्या

दर महिन्याला रवी काही रक्कम बचत करत असेल तर त्याने ईएमआयचा हप्ता वाढवून घ्यावा. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला इएमआय 10 टक्क्यांनी वाढवल्यास पूर्ण कर्जाची परतफेड 10 वर्षातच म्हणजेच 118 महिन्यातच पूर्ण होईल. अशाप्रकारे एकूण केवळ 9.96 लाख रुपयांचं व्याज भरावं लागेल. त्यामुळे तुमची तब्बल 8.46 लाख रुपयांच्या व्याजाची रक्कम वाचणार आहे. वेळोवेळी काही ठराविक रक्कम प्रीमेंट केल्यासही होमलोनची परतफेड लवकर होते. यासाठी बोनस किंवा एरिअर्सच्या रुपानं मिळालेल्या रकमेचा तुम्ही वापर करू शकता. यासोबतच नातेवाईक आणि मित्रांकडून पैशांच्या स्वरुपात मिळालेली भेट, एफडी किंवा शेअर्समधून मिळालेलेलं उत्पन्न , एखादी संपत्ती विकली असल्यास किंवा टॅक्स सेव्हिंग बचतीमधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर तुम्ही प्रीमेंटसाठी करू शकता.

तज्ज्ञ काय म्हणतात?

होमलोन परतफेडीसाठी प्री पेमेंट हा सर्वात चांगला उपाय आहे. याप्रकारे तुम्ही एकदाच भरलेल्या रकमेमुळे मूळ रकम कमी करू शकता. त्यासोबतच ईएमआय नियमितपणे भरल्यास कर्जाचा कालावधी कमी होतो,असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ राहुल शर्मा यांनी दिलाय. तुम्ही दृढनिश्चिय करून प्रयत्न केल्यास होमलोनच्या ओझ्यातून लवकरच मुक्त होऊ शकता. त्यानंतर तुम्ही कुटुंबाचं आर्थिक नियोजन चांगल्याप्रकारे करू शकता. तसेच घर कर्जमुक्त झाल्यानं आनंदही वाटेल. जर तुम्ही होमलोन भरत असाल तर कमी परतावा देणाऱ्या बचत आणि गुंतवणूक योजना बंद करून ईएमआयमध्ये वाढ करा. तसेच याकाळात स्वत:च्या सुरक्षेसाठी जीवन विम्याच्या एंडोमेट प्लान ऐवजी एखादा चांगला टर्म प्लॅनचा विमा घ्या.

संबंधित बातम्या

यूएस फेडरल रिझर्व्हकडून अखेर व्याज दरात वाढ; महागाई नियंत्रणासाठी पाऊल

गुंतवणूकदार मालामाल; 70 टक्के IPO मधून मिळाला चांगला परतावा

31 मार्चच्या आत पटापट पूर्ण करा बँकेशी संबंधित ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.