IDBI बँकेच्या ‘या’ योजनेत मिळवा दुहेरी फायदा, चांगल्या परताव्यासोबतच टॅक्सची बचत

IDBI बँकेच्या 'या' योजनेत मिळवा दुहेरी फायदा, चांगल्या परताव्यासोबतच टॅक्सची बचत
सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय....
Image Credit source: TV9

जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिता जिथे तुम्हाला अधिक परतावा देखील मिळेल आणि गुंतवणूक केलेल्या रकमेला टॅक्समधून देखील सूट मिळेल तर तुमच्यासाठी आयडीबीआय (IDBI Bank) बँकेने एक खास योजना आणली आहे.

अजय देशपांडे

|

Mar 18, 2022 | 12:52 PM

जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिता जिथे तुम्हाला अधिक परतावा देखील मिळेल आणि गुंतवणूक केलेल्या रकमेला टॅक्समधून देखील सूट मिळेल तर तुमच्यासाठी आयडीबीआय (IDBI Bank) बँकेने एक खास योजना आणली आहे. या योजनेत तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता. आयडीबीआय बँकेच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनेक फयादे मिळू शकतात. बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पाच वर्षांची एफडी करावी लागेल. तुम्ही या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला इनकम टॅक्स कायदा कलम 80C अंतर्गत टॅक्समधून (tax) सूट मिळेल असा दावा बँकेच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी देखील एक अट आहे. ती म्हणजे तुम्हाला पाच वर्षांच्या आधी हे पैसे खात्यातून काढता येणार नाहीत.

कोणाला गुंतवणूक करता येते?

आयडीबीआय बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या याजोनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये पाच वर्षांसाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेंतर्गत कोणीही खाते ओपन करू शकते फक्त अट एकच आहे तो भारतीय नागरिक असावा. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही रक्कम काढता येते. तसेच या गुंतवणुकीवर इनकम टॅक्सच्या नियमानुसार सूट देखील मिळते. या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूकीवर 5.50 टक्क्यांनी व्याज देण्यात येते, तर ज्येष्ठ नागरिकांना अधिक 0.50 म्हणजे सहा टक्के व्याज देण्यात येते.

फिक्स डिपॉझिटवर लोनची सुविधा

या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही ही गुंतवणूक तारण ठेवून, शैक्षणिक लोन, होम लोन, पर्सनल लोन देखील काढू शकता. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण परतावा मिळतो. या योजनेत खाते ओपन करण्यासाठी तुम्ही जवळच्या आयडीबीआय बँकेला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.

संबंधित बातम्या

Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला

Hurun Global Rich List 2022 : मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, अदानींच्या संपत्तीत विक्रमी वाढ

20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें