AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलुंडमध्ये बिबट्या शिरला, जुहूत घरात आढळली जिवंत मगर, मुंबई हादरली

Mumbai News : मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ येथे बिबट्या आढळला आहे. तर जुहू येथील एका घरात जिवंत मगर आढळली आहे. यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

मुलुंडमध्ये बिबट्या शिरला, जुहूत घरात आढळली जिवंत मगर, मुंबई हादरली
Leopard
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 06, 2026 | 7:40 PM
Share

गेल्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आता मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ येथे बिबट्या आढळला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा बिबट्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून साई प्रस्थ येथे येऊन कुत्र्याची शिकार केली. या भागात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरीकांची झोप उडाली आहे.

मुंलुंडमध्ये आढळला बिबट्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने अनेकदा शिकारीच्या शोधात बिबटे नागरी वस्तीत येतात. घाटकोपर ते मुलुंड या भागात अनेकदा बिबट्यांनी नागरीकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. त्यात काहींचा मृत्यूही झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेकदा हे बिबटे कुत्र्यांची शिकार करीत असल्याचे दिसून आले आहे. नागरी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेवर संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. याबाबत पालिका आयुक्त भुषण गगराणी तसेच पालकमंत्री यांच्याशी याबाबत अनेकदा चर्चा करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाला या प्रश्नाचे गांर्भीय नसल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी कालच्या साई प्रस्थच्या घटनेनंतर सांगितले.

साई प्रस्थ येथे आलेल्या बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. मात्र त्या ठिकाणी रात्री अपरात्री एखादा व्यक्ती असता तर त्याची शिकार झाली असती त्यामुळे या भागात भितीची वातावरण निर्माण झाले असून नागरीकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी संजय दिना पाटील यांनी केली आहे.

जुहूमध्ये घरात आढळली मगर

जुहू येथील एका घरातून जिवंत मगर आणि इंडियन स्पॉटेड कासव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहे. बेकायदेशीर रित्या हे प्राणी घरात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वन विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांच युनिट-9 आणि सर्प इंडिया NGO यांची संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी इम्रान शेख (29) याच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

आरोपीने हे प्राणी घरातील काचेच्या टँकमध्ये ठेवले होते. दोन्ही प्राणी शेड्युल-1 संरक्षित प्रजाती आहेत. आता हे दोन्ही प्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू करून वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!