हे तर आधुनिक कर्णच…8 लाख कोटींपेक्षा जास्त दान, रतन टाटा यांच्यांशी नाते

jamshedji tata: महाभारतातील कर्ण आपल्या दानामुळे ओळखला जातो. कर्णाने कधीच कोणाला रित्या हाताने पाठवले नाही. पण आजच्या आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वाधिक दान देणाऱ्यांच्या यादीत जमशेदजी टाटा यांचे नाव सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे.

हे तर आधुनिक कर्णच...8 लाख कोटींपेक्षा जास्त दान, रतन टाटा यांच्यांशी नाते
jamshedji tata
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 11:29 AM

jamshedji tata: भारतातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, अझीम प्रेमजी यांची नावे घेतली जातात. परंतु भारतातील सर्वाधिक दान देणाऱ्यांची यादी केल्यावर टाटा परिवाराचे नाव सर्वात वरती येते. भारतात आतापर्यंत सर्वाधिक दान दिलेल्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपचे फाउंडर जमशेदजी टाटा आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात 8.29 लाख कोटी रुपये दानमध्ये दिले आहे. ही रक्कम त्या काळातील आहे. आजच्या श्रीमंताच्या दानापेक्षा ती कितीतरी जास्त आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक कर्णच म्हणावे लागेल.

विविध क्षेत्रात दिले दान

महाभारतातील कर्ण आपल्या दानामुळे ओळखला जातो. कर्णाने कधीच कोणाला रित्या हाताने पाठवले नाही. पण आजच्या आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वाधिक दान देणाऱ्यांच्या यादीत जमशेदजी टाटा यांचे नाव सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. 2021 मधील एडेलगिव हूरून फिलंथ्रॉपी रिपोर्टनुसार, जमशेदजी टाटा यांनी शिक्षण, आरोग्य, सामजिक क्षेत्रात अनेक कामे केली आहेत. त्यामुळे देशांमध्ये अनेक संस्था उभ्या राहिल्या. त्याचा फायदा कोट्यवधी भारतीयांना झाला.

असा आहे टाटा परिवार

असा टाटा परिवार

जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये टाटा ग्रुपची स्थापना केली होती. आज टाटा इंडस्ट्रीजचा व्यवसाय 24 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. गुजरातमधील एका पारसी परिवारात जमशेदजी टाटा यांचा जन्म झाला. टाटा परिवाराची दान देण्याची संस्कृती राहिली आहे. जमशेदजी टाटा यांच्यानंतर त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतनजी टाटा यांनी ही संस्कृती पुढे सुरु ठेवली. दोराबजी टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाची सूत्र स्वीकारली.

हे सुद्धा वाचा

रतनजी टाटा यांच्यानंतर त्यांचा मुलगा जेआरडी टाटा हे टाटा समूहाचे चेअरमन राहिले. तसेच रतनजी टाटा यांनी नवल टाटा यांना दत्तक घेतले. नवल टाटा यांनी दोन लग्न केले. एकापासून रतन टाटा आणि जिम्मी टाटा ही मुले झाली. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून नोएल टाटा यांचा जन्म झाला. ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. तेच आता टाटा ग्रुपचे चेअरमन झाले.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.