AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोएल टाटा यांचा ‘टाटा सन्स’च्या IPOला विरोध का आहे? ‘या’ एका गोष्टीमुळे ख्वाडा

Tata Sons IPO : टाटा ग्रुप सातत्याने चर्चेत राहतो. टाटाच्या टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी, टायटन यांसारख्या कंपन्या माहित आहेत, पण या सर्वांवर कंट्रोल करते ती म्हणजे टाटा सन्स. परंतु टाटा सन्स ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून ती अजूनही शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झालेली नाही. ही कपंनी आता लिस्टिंगसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे, पण यामध्ये कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. काय अडचणी आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.

नोएल टाटा यांचा 'टाटा सन्स'च्या IPOला विरोध का आहे? 'या' एका गोष्टीमुळे ख्वाडा
Tata Sons Ipo NewsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 5:55 PM
Share

देशातील मोठा उद्योग समूह टाटा चर्चेत आला आहे. मुख्य कंपनी ‘टाटा सन्स’ सध्या संभाव्य IPO मुळे उद्योगजगतात ट्रेंडला आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयानंतर कंपनीला शेअर बाजारात लिस्ट होणे भाग पडू शकते. मात्र, या संभाव्य लिस्टिंगवरून कंपनीचे दोन प्रमुख भागधारक टाटा ट्रस्ट्स आणि शापूरजी पालनजी ग्रुप यांच्यात  मतभेद निर्माण झाले आहेत. हा वाद आता केवळ व्यावसायिक न राहता टाटा समूहाच्या मूळ समाजसेवेच्या तत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.

नेमके प्रकरण काय?

टीसिएस, टाटा मोटर्सवर  नियंत्रण ठेवणारी ‘टाटा सन्स’ ही सध्या एक खासगी कंपनी आहे. मात्र, RBI ने कंपनीला Upper Layer NBFC श्रेणीत समाविष्ट केले आहे. नियमानुसार, या श्रेणीतील कंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट होणे बंधनकारक असते. यातून सूट मिळावी अशी टाटा सन्सने विनंतीही केली होती. पण ती RBI ने फेटाळून लावली. परिणामी, कायदेशीर पालन करण्यासाठी कंपनीवर आता IPO आणण्याचा दबाव वाढला आहे.

नोएल टाटांचा विरोध, तर शापूरजींचा पाठिंबा

टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सचा सर्वाधिक ६६ टक्के वाटा आहे, तर शापूरजी पालनजी ग्रुपकडे १८.३७ टक्के हिस्सा आहे. पण या दोघांच्याही आयपीओबाबतच्या भूमिका पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. शापूरजी पालनजी मिस्त्री यांच्या मते, कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यास कारभारात अधिक पारदर्शकता येईल. तसेच भागधारकांना शेअर्सचे योग्य मूल्यही मिळेल.

याउलट, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांचा याला विरोध आहे. टाटा सन्सच्या नफ्यातून ट्रस्ट्सच्या माध्यमातून मोठी धर्मादाय आणि सामाजिक कार्ये चालतात. कंपनी लिस्ट झाल्यास सामान्य गुंतवणूकदारांचा आणि नफ्यासाठीचा दबाव वाढेल, ज्यामुळे टाटांचा समाजसेवेचा मूळ उद्देश बाजूला पडेल, अशी भीती आहे.

गुंतवणूकदारांसाठी IPO कधी?

सध्या टाटा समूहात अतर्गत मतभेज सुरू आहेत. RBI च्या निर्णयानंतर संचालक मंडळाने लिस्टिंगच्या प्रक्रियेवर विचार सुरू केला आहे, परंतु गुंतवणूकदारांसाठी लगेचच IPO बाजारात येणार नाही. कंपनीचे व्यवस्थापन आणि कायदेतज्ज्ञ यावर तोडगा काढण्यासाठी इतर कायदेशीर पर्यायांची चाचपणी करत आहेत. त्यामुळे आता टाटा सन्स कोणता मार्ग निवडते, याकडे संपूर्ण शेअर बाजार आणि उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.

Follow Us
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात