AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाची पुन्हा एकदा उसळी, एका SMS वर आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहेत. पण त्या भडकल्या नाहीत. पण जागतिक बाजारातील घडामोडी देशातील बाजारावर परिणाम करतातच, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ तर झाली नाही ना?

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाची पुन्हा एकदा उसळी, एका SMS वर आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
भाव एका SMS वर
| Updated on: Mar 28, 2023 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहेत. पण त्या भडकल्या नाहीत. पण जागतिक बाजारातील घडामोडी देशातील बाजारावर परिणाम करतातच. बँकिंग क्षेत्रातील घडामोडी यासाठी कारणीभूत आहेत. युरोपसह अमेरिकेतील बँकांना बुडतीचा रोग जडला आहे. टॉप-20 मधील बँका धडाधडा कोसळल्या आहेत. तर दुसरीकडे रशियाने कच्चा तेलाचं उत्पादन घटवलं आहे. तुर्कीने एक प्लँटमधून तेल उत्पादन थांबवले आहे. तर इतर घटनांचाही परिणाम तेल उत्पादनावर झाला आहे. परिणामी कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ दिसून येत आहे. आज डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 3 डॉलरची वाढ होऊन ते 72.75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 2 डॉलरची वाढ झाली, आज हा भाव 77.93 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. त्याचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) वाढ तर झाली नाही ना?

दरवाढीला कारणीभूत कोण?

रशियाने कच्चा तेलाचं उत्पादन घटवलं आहे. तुर्कीने एक प्लँटमधून तेल उत्पादन थांबवले आहे. तर इतर घटनांचाही परिणाम तेल उत्पादनावर झाला आहे. परिणामी कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ दिसून येत आहे. तर कोविड नियम शिथिल केल्यानंतर चीनने कच्चा तेलाची आयात वाढवली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2023 मध्ये आतापर्यंत चीनच्या कच्चा तेलाच्या मागणीत 6.2 टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्यावर्षी चीनमध्ये 540 दशलक्ष टन कच्चा तेलाची आयात करण्यात आली होती.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

करासंबंधी असा झाला बदल

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?