Multibagger Stock : एकदम जबराट, या सरकारी कंपनीच्या शेअरने केली कमाल

| Updated on: Mar 18, 2023 | 4:13 PM

Multibagger Stock : या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. भविष्यात हा शेअर अजून धावणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रातही या कंपनीचे मोठे योगदान आहे.

Multibagger Stock : एकदम जबराट, या सरकारी कंपनीच्या शेअरने केली कमाल
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय सरकारी कंपन्यांनी शेअर बाजारात (Share Market) जोरदार बॅटिंग करत आहेत. नवरत्न कंपन्या (Navratna Company) म्हणून या कंपन्या लोकप्रिय आहेत. लाभांश देण्यासाठी बोनस देण्यासाठी या कंपन्या सदैव अग्रेसर असतात. अशाच एका नवरत्न कंपनीने लष्करी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तसेच या कंपनीने शेअर बाजारात ही कमाल केली आहे. या कंपनीने 3 वर्षांत जवळपास 450 टक्के रिटर्न दिला आहे. या कंपनीने तर गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. या कंपनीने प्रत्येक शेअरवर 200 टक्के लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार एकदम मालामाल झाले आहे. अवघ्या तीन वर्षांतच या कंपनीने हा जोरदार परतावा दिल्याने गुंतवणूकदार हुरळून गेले आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडच्या ( Hindustan Aeronautics Limited-HUL) शेअरने अचानक उसळी घेतली. शुक्रवारी सकाळी हिंदुस्तान एयरोनॉटिक्सचा शेअर 2,839.9 रुपयांवर उघडला. गुरुवारी हा शेअर 2,723.9 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरने जवळपास 4% उसळी घेतली. सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने आणलेल्या नवीन प्रस्तावामुळे ही उलाढाल झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने 70,500 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रक्षा अधिग्रहण परिषदने (DAC) या मेगा खरेदीत लष्करासाठी हार्डवेअर खरेदीसाठी 70,584 कोटी रुपयांच्या भांडवली अधिग्रहणास मान्यता दिली आहे. देशातची हे हार्डवेअर विकसीत करण्यात येईल. त्यामुळे संरक्षण उत्पादनाला मोठी चालना मिळेल.

हे सुद्धा वाचा

HAL च्या खात्यात 32,000 कोटी

केंद्र सरकार आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 32,000 कोटी रुपयांचा करार झाला. त्यानुसार, 60 यूएच समुद्री हेलिकॉपटर खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये 56,000 कोटी रुपयांचे भारतीय नौसेनेचे प्रस्ताव आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वदेशी ब्रह्मोस मिसाइल, शक्ति इलेक्ट्रॉनिक वारफेयर सिस्टम, युटिलिटी हेलिकॉप्टर-समुद्री यांचा समावेश आहे. भारतीय नौसेनेसाठी मेड इन इंडिया निर्मित 60 युटिलिटी हेलिकॉप्टर समुद्री आणि ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुज मिसाईल खरेदीची चर्चा सुरु आहे. 307 ATAGS हॉवित्जर आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 9 ALH ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे.

HAL कंपनीला एकच नाही तर अनेक प्रस्ताव मिळाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला कॅबिनेटने हिंदुस्तान एयरोनॉटिक्सला 6,828.36 कोटी रुपयांच्या 70 HTT-40 बेसिक ट्रेनर एयरक्राफ्टच्या अधिग्रहणाला मंजूरी दिली होती. तर भारतीय तररक्षक दलासाठी HAL कडून (ALH) MK-III हे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा सुरु आहे.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी गुंतवणूकदाराचा अभ्यास आणि बाजारातील तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक आहे. ही केवळ त्या शेअर आणि कंपनीच्या कामगिरीची माहिती आहे.