Share Market : शेअर बाजाराची हनुमान उडी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांचे आनंदी आनंद गडे

| Updated on: Jun 07, 2023 | 4:59 PM

Share Market : शेअर बाजाराने हनुमान उडी घेतल्याने गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र आहे. काही गुंतवणूकदारांचे तर अनेक दिवसांचे नुकसान एकाच फटक्यात भरुन निघाले..

Share Market : शेअर बाजाराची हनुमान उडी, सेन्सेक्स 63 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांचे आनंदी आनंद गडे
मालामाल
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) सातत्याने आगेकूच करत आहे. त्याचा वेग कायम आहे. सध्या सगळीकडूनच अनुकूल परिस्थिती दिसत असल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने बुधवारी 63 हजारांचा टप्पा पार केला. बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्सने (BSE Sensex) 350.08 अंकाची उसळी घेतली. बीएसई 63,142.96 अंकावर बंद झाला. तर एनएसई निफ्टी पण 127.40 अंकांच्या तेजीसह 18,726.40 अंकांवर पोहचला. शेअर बाजारात तेजीचे सत्र असल्याने गुंतवणूकदारांचा (Investors) मोठा फायदा झाला. गेल्या 5 दिवसांत त्यांनी चिक्कार पैसा छापला. शेअर बाजाराने हनुमान उडी घेतल्याने गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र आहे. काही गुंतवणूकदारांचे तर अनेक दिवसांचे नुकसान एकाच फटक्यात भरुन निघाले..

इतक्या लाख कोटींचा फायदा
शेअर बाजारात तेजीचे सत्र असल्याने गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. त्यांची संपत्ती या 5 दिवसांत जवळपास 5 लाख कोटी रुपयांनी वाढली. 1 जून रोजी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण भांडवल 2.84 लाख झाले होते. आज, 7 जून रोजी बाजार बंद झाला तेव्हा भांडवल वाढून ते 2.89 लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास 5 लाख कोटींचा फायदा झाला.

जागतिक बाजाराचे सकारात्मक संकेत
जागितक बाजाराने सकारात्मक संकेत दिल्याने बुधवारी शेअर बाजाराने सुरुवातीलाच जोरदार मुसंडी मारली. 30 शेअर असणाऱ्या बीएसई सेन्सेक्सने मजबूत सुरुवात केली. सुरुवातीच्या सत्रात 235.1 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 63,027.98 अंकावर उघडला. सेन्सेक्सच्या कंपन्या नेस्ले, पॉवर ग्रिड, एल अँड टी, एक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, इन्ससईंड बँक आणि टीसीएस शेअरचे गुंतवणूकदार मालामाल झाले. तर महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, मारुती आणि कोटक बँकेच्या शेअरमध्ये घसरण होती.

हे सुद्धा वाचा

या कंपन्यांची कामगिरी
आजच्या व्यापारी सत्रात बाजारातील सर्वच सेक्टरमधील शेअरमध्ये तेजी दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑईल अँड गॅस सेक्टरमधील शेअर्सनी तुफान कामगिरी बजावली. या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक्सने जोरदार बॅटिंग केली. या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी मिडकॅपमध्ये 354 अंकांची उसळी होती. सेन्सेक्सच्या 30 शेअर्समधील 25 शेअर्समध्ये जोरदार तेजी होती. तर 5 शेअर्समध्ये घसरण दिसली. तर निफ्टीतील 50 शेअर्समधील 42 शेअर्समध्ये तेजी होती तर 8 शेअर्समध्ये घसरण होती.

असा झाला फायदा
आजच्या व्यापारी सत्रात गुंतवणूकदारांनी जोरदार छपाई केली. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप जोरदार वाढले. आज मार्केट कॅप 289.07 लाख कोटीवर पोहचले. मंगळवारी हे 286.62 लाख कोटी रुपये होते. म्हणजे गुंतवणूकदारांची संपत्ती 2.45 लाख कोटी रुपयांनी वाढली.