अनंत अंबानी आणि राधिकाचे लंडन नव्हे तर ‘या’ शहरात होणार लग्न, मोठे अपडेट पुढे, आता विसरा अबूधाबी आणि..

Anant Ambani and Radhika Merchant wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल लोकांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळतंय. अनंत अंबानी आणि राधिकाचे प्री वेडिंग फंक्शन काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये पार पडले. विशेष म्हणजे हे प्री वेडिंग फंक्शन तब्बल तीन दिवस सुरू होते. आता अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाबद्दल मोठे अपडेट येत आहे.

अनंत अंबानी आणि राधिकाचे लंडन नव्हे तर या शहरात होणार लग्न, मोठे अपडेट पुढे, आता विसरा अबूधाबी आणि..
Anant Ambani and Radhika Merchant
| Updated on: Apr 24, 2024 | 6:35 PM

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरात येथील जामनगर येथे पार पडले. विशेष म्हणजे हे प्री वेडिंग फंक्शन तब्बल तीन दिवस सुरू होते. या प्री वेडिंग फंक्शनसाठी फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक पोहचले होते. बाॅलिवूडचे तर जवळपास सर्वच कलाकार हे या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले होते. या प्री वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यावेळी बाॅलिवूड कलाकारांनी स्टेजवर डान्स केल्याचे देखील बघायला मिळाले.

आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शननंतर सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत, त्या म्हणजे यांच्या लग्नाकडे. मध्यंतरी एका रिपोर्टनुसार अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे लग्न लंडनमधील स्टोक पार्क एस्टेटमध्ये होणार आहे. हे एक अत्यंत आलिशान असे हाॅटेल असून अत्यंत लग्झरी आहे, येथे अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे.

आता नुकताच एक रिपोर्ट आलाय. या रिपोर्टनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न लंडन आणि संगीताचा कार्यक्रम अबूधाबीमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे संपूर्ण लग्न मुंबईमध्ये पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल विविध अपडेट येताना दिसत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलै महिन्यात पार पडणार आहे. जवळपास लोकांना या लग्नाचे निमंत्रण पाठवण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय. बाॅलिवूड कलाकार, क्रिकेटर, बिझनेसमॅन, राजकिय नेते आणि विदेशातूनही लोक या विवाहसोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जातंय. जोरदार तयारी सुरू आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तब्बल नऊ पानी पत्रिका असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. पाहुण्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था केल्याचे देखील सांगितले जात आहे. आता या विवाहसोहळ्याच्या प्रत्येक अपडेटकडे लोकांच्या नजरा लागल्याचे देखील बघायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये कोट्यवधी रूपये खर्च लागल्याचे सांगितले जाते.