Petrol Price | देव करो अन् असली भाकितं चुलीत जावो, पेट्रोल 385 रुपये प्रति लिटर होणार? आंतरराष्ट्रीय बाजाराचे संकेत काय?

petrol Price Hike: आता ही शक्यता आहे. लागलीच घाबरून जाण्याची गरज नाही. नवीन मुख्यमंत्र्यांनी मूल्यवर्धित करात कपातीची घोषणा केली आहे. तोवर हा मीठाचा खडा पडला. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चे तेलाचे दर 380 डॉलर प्रति लिटर जाण्याची भीती आहे.

Petrol Price | देव करो अन् असली भाकितं चुलीत जावो, पेट्रोल 385 रुपये प्रति लिटर होणार? आंतरराष्ट्रीय बाजाराचे संकेत काय?
पेट्रोलचे दर वाढण्याची भीती
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 05, 2022 | 11:09 AM

आता हे भाकीत आहे बरं का. आपला अंदाज. होईलच असं नाही, पण घडू ही शकतं. आंतरराष्ट्रीय भूराजकीय घडामोडीच तशा घडत आहे. त्याला पर्याय नाही. आपल्या नवीन मुख्यमंत्र्यांनी (Maharashtra CM) मूल्यवर्धीत करात (VAT) कपातीची काल घोषणा केली नी हा मीठाचा खडा पडला. तर भाकीत असे आहे की, देशात पेट्रोलच्या किंमती(Petrol Price) तिप्पटीनं वाढणार. कारण रशिया आणि युक्रेन यांचा तंटा (Russia Ukraine Crisis). हे भांडण चार महिन्यांपासून थांबायचं नाही काही घेईना. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या(Crude Oil Price) किंमती 380 डॉलर प्रति लिटर जाण्याची भीती आहे. हा भडका उडाला तर देशातील पेट्रोलचे दर 385 रुपये प्रति लिटर होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या देशात 100 ते 120 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळते. यामुळे सर्वसामान्य भारतीय नाकेनऊ आला आहे. त्यात जे. पी. मॉर्गन चेस अँड कंपनीने (JPMorgan Chase and Company)असा अंदाज वर्तवून झोप उडवून टाकली आहे. त्यामुळेच आम्ही म्हणतोय, देव करो अन् असली भाकितं चुलीत जावो.

380 डॉलर प्रति बॅरलचा दर

जे. पी. मॉर्गन चेस अँड कंपनीने हा अंदाज वर्तवला आहे. त्यावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर भूकंप आला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 111 डॉलर प्रति बॅरल आहे. भारतीय तेल उत्पादक कंपन्या अगोदरच पेट्रोल कमी दराने विक्री होत असल्याची ओरड करत आहेत. त्यातच या बातमीने कहर केला आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी कडक निर्बंध लादल्यास रशिया ही त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची शक्यता आहे. रशिया इंधनाचे उत्पादन घडवणार आहे. त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येईल आणि कच्च्या तेलाच्या(Crude Oil Price) किंमती 380 डॉलर प्रति लिटर जाण्याची भीती आहे.

काय सांगतो अहवाल

जे.पी. मॉर्गन या संस्थेच्या अहवालानुसार, जर पुतिन यांनी दररोज केवळ 5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन घटवले तरी ही रशियन अर्थव्यवस्थेचे काही नुकसान होणार नाही. पण जागतिक अर्थव्यवस्थांसमोर त्यामुळे अडथळ्यांची शर्यत तयार होईल. जर रशियाने रोज केवळ 3 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन घटवले तरी लंडन क्रुड ऑईलच्या किंमतीत प्रचंड उलथापालथ होईल. या किंमती 190 डॉलर प्रति बॅरल होतील. 5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन घटवले तर या किंमती सुसाट पळतील आणि 380 डॉलर प्रति बॅरल होतील. जर रशियाने हा अंदाज खरा केला तर जगात हाहाकार उडेल.अनेक अर्थव्यवस्थांना या दराने इंधन खरेदी करणे अवघड होईल आणि या देशाचे दळणवळण ठप्प होऊन श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढवेल.

भारत मोठा आयातदार

एप्रिलनंतर भारताने रशियाकडून 50 पट्टीने जास्त कच्चे तेल खरीदे केले आहे. भारताच्या एकूण कच्चे तेल आयतीत रशियाकडून इंधन खरेदीचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता ही टक्केवारी 10 टक्क्यांनी वाढली आहे. युक्रेनसोबत युद्ध सुरु होण्यापूर्वी भारताने रशियाकडून केवळ 0.2 टक्के तेल खरेदी केले होते.