
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न लंडन नव्हे तर भारतामध्येच होईल. 12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न मुंबईमध्ये होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचा आज शेवटचा दिवस आहे. या प्री वेडिंग फंक्शनला अत्यंत खास लोक सहभागी झालेत. हे दुसरे प्री वेडिंग फंक्शन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे पहिले प्री वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगर येथे झाले. गुजरातमधील प्री वेडिंग फंक्शनला देखील विदेशातून लोक सहभागी झाले होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री वेडिंग फंक्शन 29 मेपासून सुरू आहे. एका लक्झरी क्रूझवर हे सुरू आहे. आज या प्री वेडिंग फंक्शनचा शेवटचा दिवस आहे. हे क्रूझ इटलीवरून फ्रान्सला जातंय. अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे क्रूझवर पार्टीसाठी पोहचले आहेत. हेच नाही तर या प्री वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. या पोस्टनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये क्रूझवर पाहुण्यांसाठी साऊथ इंडियन पदार्थ खास ठेवण्यात आले. साऊथ इंडियन पदार्थांची मेजवाणी पाहुण्यांसाठी होती. मुळात म्हणजे या प्री वेडिंग फंक्शनमध्ये जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली.
अंबानी कुटुंबाला विशेषतः गुजराती आणि साऊथ इंडियन पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमधून पाहुण्यांसाठी खास साऊथ इंडियन पदार्थाची व्यवस्था करण्यात आली. कॅफेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याचे काही फोटोही शेअर करण्यात आलेत. मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, त्यांना साऊथ इंडियन पदार्थ आवडतात.
कॅफेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, आणखी एक मोठी कामगिरी, आणखी एक यश. स्पेनमधील @celebritycruises वर होत असलेल्या जगातील प्रसिद्ध प्री वेडिंग सेलिब्रेशनचा एक भाग बनताना आम्हाला आनंद होत आहे. @therameshwaramcafe हे साऊथमधील एकमेव रेस्टॉरंट आहे, जे उत्कृष्ट साऊथ इंडियन जेवण देते.