आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये

| Updated on: Apr 14, 2022 | 8:32 AM

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) गॅसच्या दरवाढीचा धडाका सुरू आहे. आज पुन्हा एकदा दिल्लीसह काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रमुख सीएनजी गॅस वितरक कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (Indraprastha Gas Ltd) सीएनजी आणि पीएनजीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज पुन्हा सीएनजी, पीएनजीचे दर वाढले; देशातील सर्वात महाग सीएनजी गुरुग्राममध्ये
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) गॅसच्या दरवाढीचा धडाका सुरू आहे. आज पुन्हा एकदा दिल्लीसह काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रमुख सीएनजी गॅस वितरक कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (Indraprastha Gas Ltd) सीएनजी आणि पीएनजीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरवाढीनुसार सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 2.5 रुपयांची वाढ झाली आहे, तर पीएनजीच्या दरात प्रति किलो 4.25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्याची राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 71.61 रुपयांवर पोहोचली आहे. नवी दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. नव्या दर वाढीनुसार ग्रेटर नोएडा आणि गाझीयाबादमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 74.17 रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुग्राममध्ये देशातील सर्वात महाग सीएनजी मिळत असून, सीएनजीची किंमत प्रति किलो 79.94 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र दुसरीकडे आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

राज्यातील सीएनजीचे दर

राज्यात मंगळवारीच सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. पुण्यासह मुंबईत मंगळवारी सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची तर पीएनजीच्या दरात साडेचार रुपयांची वाढ करण्यात आली होती. गुड्स रिटर्न वेबसाईटनुसार आज मुंबईमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 72 रुपये एवढे आहेत. तर पुण्यात मुंबईपेक्षा सीएनजी महाग भेटत असून, सीएनजीचे दर प्रति किलो 73 रुपये एवढे आहेत. आज राज्यात सीएनजीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

एकीकडे राज्यासह देशभरात सीएनजी, पीएनजीच्या दरात मोठ्याप्रमाणात वाढ सुरू आहे. मात्र दुसरीकडे गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज देखील इंधनाचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या भावात शेवटची दरवाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून दर स्थिर आहेत. 22 मार्चपासून ते सहा एप्रिलपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

महागाईचा कहर! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, FMCG वस्तूंच्या खरेदीत घसरण

LIC IPO या महिन्याच्या शेवटी गाठणार मुहूर्त; 12 मेपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता

पुण्यानंतर आता मुंबईकरांनाही CNG दरवाढीचा फटका; सीएनजीमध्ये पाच तर पीएनजीमध्ये साडेचार रुपयांची वाढ