पुण्यानंतर आता मुंबईकरांनाही CNG दरवाढीचा फटका; सीएनजीमध्ये पाच तर पीएनजीमध्ये साडेचार रुपयांची वाढ

देशांतर्गंत उत्पादित नैसर्गिक वायुची (Natural gas) विक्री किंमत केंद्राकडून 110 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याने, त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसला आहे, विक्री किंमत वाढल्याने महानगर गॅसने देखील सीएनजीच्या दरात वाढ (CNG price hike) केली आहे.

पुण्यानंतर आता मुंबईकरांनाही CNG दरवाढीचा फटका; सीएनजीमध्ये पाच तर पीएनजीमध्ये साडेचार रुपयांची वाढ
सीएनजीच्या दरात वाढ
अजय देशपांडे

|

Apr 13, 2022 | 9:21 AM

मुंबई : देशांतर्गंत उत्पादित नैसर्गिक वायुची (Natural gas) विक्री किंमत केंद्राकडून 110 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याने, त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसला आहे, विक्री किंमत वाढल्याने महानगर गॅसने देखील सीएनजीच्या दरात वाढ (CNG price hike) केली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. सीएनजीची किंमत प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीचे दर 72 रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे पीएनजीच्या (png) दरात देखील चार रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये पीएनजीचे भाव वाढून प्रति किलो 45 रुपये 50 पैशांवर पोहोचले आहेत. एकीकडे गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, मात्र दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात येत असल्याने पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

पुण्यातही सीएनजीचे दर वाढले

केवळ मुंबईतच नव्हे तर पुण्यात देखील सीएनजीचे दर वाढले आहेत. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलोवरून 72 रुपयांवर पोहोचले आहेत. वाढत्या सीएनजीचा मोठा फटका आता पुणेकरांना बसणार आहे. किलोमागे पाच रुपये त्यांना जादा मोजावे लागणार आहेत. आधीच राज्यात महागाईचा भडका उडला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती भडकल्या आहेत, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्यासह सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता सीएनजी दरवाढीच्या संकटाला समोर जावे लागणार आहे.

व्हॅट कमी करण्याचा निर्णय

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून सीएनजीवरील व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आली. नव्या दरानुसार सीएनजी गॅस सहा रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने सीएनजी महागला आहे. मुंबई आणि पुण्यात सीएनजी, पीएनजीचे दर गगनाला भिडले आहेत.

संबंधित बातम्या

आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; खतांवरील सबसीडी वाढणार?

Petrol-Diesel price : सलग सातव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

CNG rates hike : महागाईचा भडका, पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांची वाढ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें