Today Petrol Diesel price : राज्यात आजही इंधनाचे दर स्थिर; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आज देखील इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, पेट्रोल,डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.

Today Petrol Diesel price : राज्यात आजही इंधनाचे दर स्थिर; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 30, 2022 | 6:48 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सहा एप्रिल पासून ते 30 एप्रिल असे सलग 25 दिवस इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. एकीकडे कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे असताना देखील सलग 25 दिवस देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यापूर्वी 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर या काळात प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक महाग झाले. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधांनी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर (Petrol Price in Delhi Today) 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये (Petrol Price in Mumbai Today) पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दारानुसार राज्यात देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये आहे तर डिझेलचा दर 103.79 रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.40 रुपये असून, डिझेल प्रति लिटर 103.73 रुपये लिटर आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये असल्याचे पहायला मिळत आहे. परभणीत पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 123.51 आणि 106.10 रुपये लिटर आहे. तर पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 120.20 रुपये लिटर असून, डिझेल 103.10 लिटर आहे.

इंधन दरवाढीवरून राज्य, केंद्र सरकार आमने-सामने

इंधनावर आकारण्यात येणारा टॅक्स कमी करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. आता त्यावरून आरोपांच्या फैरी झडत आहेत. इंधन दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. तर इंधन दरवाढ कमी करायची असल्यास राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.