Today’s petrol, diesel rates : 42 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

| Updated on: May 19, 2022 | 6:46 AM

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मात्र आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात कोणताही बादल करण्यात आला नसून, गेल्या 42 दिवसांपासून भाव स्थिर आहेत.

Todays petrol, diesel rates : 42 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल डिझेलचे दर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : गेल्या 42 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol, diesel prices) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. सहा एप्रिल रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती. या काळात पेट्रोल, डिझेलचे दर लिटर मागे तब्बल दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढले होते. मात्र आता इंधन दरवाढीला ब्रेक लागला आहे. राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 तर डिझेल प्रति लिटर 96.67 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव 115.12 रुपये लिटर असून, डिझेलचा दर प्रति लिटर 110.85 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.85 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 100.94 रुपये आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

  1. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये आहे.
  2. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 रुपये तर डिझेलचा दर 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 104. 50 रुपये आहे.
  5. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा रेट प्रति लिटर 120.40 तर डिझेलचा रेट 103.73 रुपये आहे.