Today petrol, diesel rates : इंधनाचे नवे दर जारी; सलग 22 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

| Updated on: Apr 27, 2022 | 6:54 AM

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज 22 दिवस झाले पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत.

Today petrol, diesel rates : इंधनाचे नवे दर जारी; सलग 22 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
पेट्रोल, डिझेलचे दर
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज 22 दिवस झाले, पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. सहा एप्रिल रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाचे दर आतंरराष्ट्रीय पातळीवर वाढताना दिसत आहेत, मात्र दुसरीकडे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये लिटर आहे. आर्थिक राजधांनी मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 115.12 आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 110.85 रुपये आणि 100.94 प्रति लिटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

  1. पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राज्यात इंधनाचे दर स्थिर आहेत. आज 22 व्या दिवशी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.
  2. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 120.40 तर डिझेलचा भाव 103.73 रुपये लिटर आहे.
  3. पुण्यात पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.20 आणि 103.10 रुपये प्रति लिटर आहे.
  4. राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत असून, परभणीमध्ये पेट्रोल 123.51 रुपये लिटर तर डिझेल प्रति लिटर 106.10 रुपये लिटर आहे.
  5. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये असून डिझेलचा भाव 103.79 रुपये आहे.