देशभरात थर्माकॉलनं टॉयलेट बनवणारे टॉयलेट मॅन, कोण आहेत रामदास माने?

| Updated on: Aug 22, 2021 | 9:03 AM

होय, रामदास माने या मराठमोठ्या उद्योजकानं चक्क थर्माकॉलपासून टॉयलेट बनवलीत. रामदास मानेंनी मोदींच्या स्वच्छ भारत अभिनायाला हातभार लावत चक्क कमी किमतीत टॉयलेट बनवण्याची किमया साधलीय. चला तर रामदास मानेंबद्दल जाणून घेऊयात.

देशभरात थर्माकॉलनं टॉयलेट बनवणारे टॉयलेट मॅन, कोण आहेत रामदास माने?
ramdas mane
Follow us on

मुंबईः सध्याच्या काळात टॉयलेटला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालंय. चाळ आणि वाडा संस्कृतीमध्ये टॉयलेट नेहमीच घराबाहेर पाहायला मिळतात. पण आता बहुतेक ठिकाणी घरात टॉयलेट असतात. दगडविटांनी बांधलेली टॉयलेट आपण पाहिलीच असेल. पण थर्माकॉलनं बनवलेली टॉयलेट कधी पाहिलीत का? होय, रामदास माने या मराठमोठ्या उद्योजकानं चक्क थर्माकॉलपासून टॉयलेट बनवलीत. रामदास मानेंनी मोदींच्या स्वच्छ भारत अभिनायाला हातभार लावत चक्क कमी किमतीत टॉयलेट बनवण्याची किमया साधलीय. चला तर रामदास मानेंबद्दल जाणून घेऊयात.

शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते कित्येक महिने फुटपाथवर झोपले

शिक्षण पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर झोपून दिवस काढलेले रामदास माने यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झालाय. साताऱ्यातील माण तालुक्यातील लोधवडे हे त्यांचे मूळ गाव आहे. इथेच त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची होती, तरीही त्यांनी गावीच 10 वीपर्यंत शिक्षण घेतले. तेव्हा ते वडिलांसोबत शेतीही करत होते. पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी कठोर परिश्रम केले आणि अर्धवेळ नोकरीसुद्धा स्वीकारली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते कित्येक महिने फुटपाथवर झोपले होते. अभ्यासासाठी पैसे गोळा करण्यासाठी ते रात्री कॅन्टीनमध्ये काम करायचे. तिथे त्यांनी सुरुवातीला लहानसा उद्योग सुरू केला. त्यानंतर या छोट्या उद्योगातून भरारी घेत त्यांनी जगातले सर्वात मोठे थर्माकॉल तयार करणारे मशीन बनवले.

माने ग्रुप ऑफ कंपनीज 1993 मध्ये सुरू

माने यांनी त्यांची कंपनी माने ग्रुप ऑफ कंपनीज 1993 मध्ये सुरू केली. तेव्हा त्यांची कंपनी थर्माकोल बनवायची. त्याच्या कंपनीने बनवलेली मशीन्स 45 देशांना पाठवण्यात आली. भारतात 80 टक्के थर्माकोल त्याच्या कंपनीने बनवलेल्या मशीनद्वारे तयार केले जाते. माने यांच्याकडे थर्माकोल रिसायकलिंगचे पेटंटही आहे. संपूर्ण भारतात आणि जगभरातील 45 देशात माने थर्माकॉल बनवण्याचा प्लांट, मशीनरीसह थर्माकॉल निर्यात करतात. थर्माकॉलपासून रेडिमेड आरसीसी टॉयलेट बनवून देशातल्या 17 राज्यांमध्ये ना नफा ना तोटा या तत्त्वावर देत आहेत. 2016 मध्ये त्यांना सेनिटेशन लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे 2007 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नाव नोंदवले गेलेय. रामदास माने यांना ऑस्ट्रेलिया आणि उरुग्वेकडूनही पुरस्कार मिळालेत.

जगातील सर्वात स्वस्त थर्माकॉल बनवण्याचे मशीन

आज त्यांच्या कंपनीची उलाढाल 40 कोटी आहे. त्याच्या कंपनीत 70 लोक काम करतात. त्यांची कंपनी जगातील सर्वात स्वस्त थर्माकोल बनवण्याचे मशीन बनवते. रामदास यांनी थर्माकोलवर सिमेंट कोटिंगच्या मदतीने अवघ्या दोन तासात शौचालय तयार करण्याचा मार्ग शोधून काढला. रामदास माने यांचा शोध पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे. या तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील लोकांना शौचालये सहज उपलब्ध होऊ शकतात. ही शौचालये फक्त 22 हजार रुपयांमध्ये तयार होणार आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना बनवण्यासाठी फक्त दोन तास लागतात. माने म्हणतात की, त्यांचा व्यवसाय ना तोटा आणि ना नफा यावर आधारित आहे.

माढ्याचा विकास करण्याचे ध्येय घेऊन माने लोकसभेच्या रिंगणात उतरले

विशेष म्हणजे रामदास माने हे माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढले होते. माढ्याचा विकास करण्याचे ध्येय घेऊन माने लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. पेनाची निब हे त्यांचे निवडणूक चिन्ह होते. माढा मतदारसंघात माने यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत झाला होता. या निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले होते.

संबंधित बातम्या

30 सप्टेंबरपर्यंत Home Loan वर अनेक ऑफर्स, प्रक्रिया शुल्क माफ आणि व्याजावर विशेष सवलत

EPFO च्या वेबसाईटवर वारंवार पासवर्ड टाकण्याची झंझट दूर; ‘या’ अॅपवर एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

Toilet man making thermocol toilets across the country, Who is Ramdas Mane?