AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : आनंदवार्ता! कच्चा तेलाची घसरगुंडी, किती स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने स्वस्ताईची वर्दी दिली. आज भावात प्रचंड घसरण झाल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात ग्राहकांना दिलासा मिळाला. जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती...

Petrol Diesel Price Today : आनंदवार्ता! कच्चा तेलाची घसरगुंडी, किती स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल
भावात घसरण
| Updated on: Apr 20, 2023 | 8:29 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने स्वस्ताईची वर्दी दिली. क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या भावात तफावत दिसून येत आहे. ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) जवळपास 2 डॉलरची घसरण नोंदविण्यात आली. आज हा भाव 78.80 प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 2 डॉलरची घसरण झाल्याने भाव 82.81 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला. राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) फरक पडल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

तर भारतावर परिणाम नाही रशिया पाठोपाठ आता इराण भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 107.16 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.82 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.38 आणि डिझेल 92.90 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.78 तर डिझेल 94.25 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.61 तर डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.64 तर डिझेल 95.08 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.63 आणि डिझेल 93.12 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये तर डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...