UPI व्यवहारात आता हा मोठा बदल, या तारखेपासून बदलणार नियम

UPI व्यवहार आता पूर्वीपेक्षा जलद होणार आहेत. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा जलद आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) नवा रिस्पॉन्स टाईम निश्चित केला आहे.

UPI व्यवहारात आता हा मोठा बदल, या तारखेपासून बदलणार नियम
| Updated on: May 02, 2025 | 2:54 PM

युपीआय ट्रांझक्शन आता पूर्वीपेक्षा वेगाने होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ( UPI ) सर्व्हीसला आणखी वेगवान आणि विश्वासार्ह करण्यासाठी रिस्पॉन्स टाईम निश्चित केला आहे. २६ एप्रिल रोजी जारी केलेल्या सर्क्युलरनुसार NPCI ने सर्व बँका आणि पेमेंट्स ॲपना निर्देश दिले आहेत. १६ जून २०२५ पासून नवीन प्रोसेसिंग मानके लागू होणार आहेत. UPI दर महिन्यास सुमारे २५ लाख कोटी रुपयांचे डिजिटल ट्रांझक्शन प्रोसेस करत आहे.त्यामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नव्या नियमांमुळे युपीआयचे आर्थिक व्यवहार अधिक जलद आणि खात्रीशीर होणार आहेत.

व्यवहार पूर्ण होण्यास आता किती वेळ ?

नवीन नियमांनुसार युपीआयने संबंधित अनेक सर्व्हीससाठी आता प्रतिसादाचा वेळ पूर्वीपेक्षा कमी केली आहे. आता रिक्वेस्ट पे आणि रिस्पॉन्स पे सर्व्हीस नवीन नियमानुसार रिस्पॉन्स टाईम ३० सेकंदाऐवजी करुन १५ सेकंदाचा केला आहे. चेक ट्रांझक्शन स्टेटस आणि ट्राक्झशन रिव्हर्ससाठी १० सेंकद आणि व्हॅलीडिटी एड्रेससाठी १० सेकंद केला आहे. एनपीसीआयने सर्व युपीआय नेटवर्कशी जोडलेल्या बँका आणि पेमेंट सर्व्हीस प्रोव्हायडरना ( उदा. GPay, PhonePe आदी ) सल्ला दिला आहे की प्रतिसादाची वेळ कमी केल्याने कोणताही तांत्रिक समस्या उद्भवू नयेत याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे.

 यंत्रणेत मोठा बिघाड

युपीआय व्यवहारांना अलिकडेच तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. १२ एप्रिल रोजी मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी अनेक ट्राक्झशन फेल झाले होते. मार्च आणि एप्रिलमध्ये तीन वेळा २६ मार्च, १ एप्रिल, १२ एप्रिल रोजी यंत्रणेत मोठा बिघाडाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे डिजिटल पेमेंट करताना मोछ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल  उचलले गेले  आहे.