Gas Oil : शाब्बास, भारताने इतिहास घडविला, विरोध करणाऱ्या महाशक्तीलाच भारत करतोय इंधन पुरवठा..

| Updated on: Nov 11, 2022 | 9:05 PM

Gas Oil : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करु नये यासाठी दबाव टाकणारे देश आता भारताकडे मदत मागत आहेत..

Gas Oil : शाब्बास, भारताने इतिहास घडविला, विरोध करणाऱ्या महाशक्तीलाच भारत करतोय इंधन पुरवठा..
आता भारताकडून इंधनाचा पुरवठा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : रशियाकडून (Russia) इंधन खरेदी करु नये यासाठी अमेरिकेसह (America) युरोपीय राष्ट्रांनी भारतावर एकदम दबाव टाकला होता. पण भारताने हा दबाव झुगारुन टाकला. भारताच्या (India)  स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची चुणूक जगाने पाहिली. फेब्रुवारीत भारत रशियाकडून 0.2 टक्के कच्चे तेल (Crude Oil) आयात करत होता. सध्या भारत रशियाकडून 22 टक्के इंधन आयात करत आहे.

भारताला स्वस्तात इंधन मिळत आहे. रशियावर निर्बंध लादल्याने अमेरिकेने आता भारताकडे इंधन पुरवठ्यासाठी मदत मागितली आहे. भारताच्या कुटनीतीचा हा एक मोठा विजय मानण्यात येत आहे.

कच्चे तेलाची मागणी कमी होऊ नये आणि तुटवडा होऊ नये यासाठी अमेरिकेने पूर्वीपासूनच तयार सुरु केली आहे. थेट रशियाला इंधन मागता येत नसल्याने अमेरिकेने भारताकडे पुरवठ्यासाठी मदत मागितली.

हे सुद्धा वाचा

जागतिक तेल पुरवठादार Vitol आणि Trafigura या दोघांनी भारतीय रिफायनरी नायरा एनर्जीकडून 10 ते 15 डॉलर प्रति बॅरलच्या हिशोबाने एक-एक कार्गो व्हॅक्यूम गॅस ऑईल (VGO) खरेदी केले आहे.

हे कार्गो विमान डिसेंबर महिन्यात भारताच्या वादीनार पोर्टवरुन अमेरिका अथवा युरोपात जाईल. VGO हे एक प्रकारचे कच्चे तेल असून त्यापासून गॅसोलिन आणि डिझेल तयार करण्यात येते.

यापूर्वी Aframax tanker Shanghai Dawn ने ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर पोर्ट येथे VGO ची मागणी नोंदवली होती. कंपनीने जवळपास 80 हजार टन VGO खरेदी केले. ही खेप नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत पोहचली होती.

गेल्या वर्षीपेक्षा भारताने अमेरिकेला व्हॅक्यूम गॅस ऑईलची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. मे 2021 मद्ये अमेरिकेने केवळ एक कार्गो VGO ची खरेदी केली होती. यंदा मात्र अनेकदा अमेरिकेने भारताकडून VGO ची खरेदी केली आहे.

भारत सध्या इतर देशांपेक्षा रशियाकडून सर्वात जास्त कच्चे तेल खरेदी करत आहे. भारत जगातील तेल खरेदी करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे. भारत रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल आणि VGO ची खरेदी करुन ते अमेरिकेसह युरोपीयन देशात विक्री करत आहे.