देशात महागाईचा उच्चांक; भाजीपाल्याचे दर वाढले, टोमॅटो 80 रुपये किलो

| Updated on: Nov 23, 2021 | 1:16 PM

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा भडका उडाला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये  टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचले आहेत.

देशात महागाईचा उच्चांक; भाजीपाल्याचे दर वाढले, टोमॅटो 80 रुपये किलो
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा भडका उडाला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये  टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचले आहेत. तर वाटाण्याचे दर प्रति किलो 100 रुपये झाले आहेत. डिझेलचे दर प्रचंड वाढले, त्यात आणखी भर म्हणजे दक्षिण भारतामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाजीवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. पीक खराब होऊन भाज्यांची आवक मागणीपेक्षा कमी झाल्याने दरामध्ये तेजी दिसून येत आहे.

डिझेल दरवाढीमुळे भाव वाढले

याबाबत बोलताना भाजी विक्रेत्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला, वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. भोपाळ चेन्नई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये टॉमॅटो 80 रुपये किलोंवर पोहोचले आहेत, तर एक किलो वाटाण्यासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत. कांदा देखील 30 रुपये किलो झाला आहे. वाढत्या महागाईचा फटका जसा ग्राहकांना बसत आहे, तसाच तो किरोकोळ व्यापाऱ्यांना देखील बसत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

दक्षिण भारतातून येणारी आवक घटली 

दक्षिण भारतामध्ये टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक खराब झाल्याने दक्षिण भारतामधून येणाऱ्या टोमॅटोची आवक घटली, परिणामी दिल्लीसह देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे दर 80 रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. भाजीपाला महागल्याने त्याची मोठी आर्थिक झळ ग्राहकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

चेन्नईमध्ये महागाईचा उच्चांक 

चेन्नईमध्ये भाजीपाल्याच्या किमतीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. शहरात एक किलो टोमॅटोसाठी तब्बल 160 रुपये मोजावे लागत आहेत, तर वाटाने 200 रुपयांवर पोहोचे आहेत.  कांदा देखील महाग झाला असून, काद्याचे भाव प्रति किलो 50 रुपयांवर पोहोचले आहेत. आणखी काही दिवस तरी भाजीपाल्याचे दर कमी होणार नसल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

शेअरबाजारात सलग दुसाऱ्या दिवशी पडझड; सेन्सेक्स 748 अंकांनी घसरला

ज्येष्ठ नागरिक रेल्वेच्या सवलतींपासून वंचित; 4 कोटी जणांकडून पूर्ण भाड्याची वसुली

गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकतो मोठा तोटा