Job Cut: एका झटक्यात 1,00,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकणार; एकावेळी चार कारखाने बंद पडणार

फोक्सवॅगनमध्ये कर्मचारी कपातीची सुरुवात झाली असून आता तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

Job Cut: एका झटक्यात 1,00,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकणार; एकावेळी चार कारखाने बंद पडणार
volkswagen layoffs
| Updated on: Jun 27, 2026 | 11:14 AM

गेल्या काही महिन्यांत, आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाली आहे आणि आता वाहन क्षेत्रालाही मोठा फटका बसू शकतो. मॅनेजर मॅगझिनमधील एका अहवालानुसार, युरोपमधील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन एजीचे सीईओ, ऑलिव्हर ब्लूम, कंपनीला अधिक स्पर्धात्मक बनवण्याच्या प्रयत्नात हजारो नोकऱ्या कमी करण्याचा आणि काही कारखाने बंद करण्याचा विचार करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देत मॅनेजर मॅगझिनने शुक्रवारी वृत्त दिले की, या आठवड्याच्या सुरुवातीला व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत सादर केलेल्या सीईओच्या योजनांमध्ये कर्मचारी कपात दुप्पट करून 1,00,000 पर्यंत नेण्याचा समावेश आहे. पोर्शे आणि ऑडीची मालकी असलेल्या या कंपनीत सध्या अंदाजे 6,57,000 लोक काम करतात.

आर्थिक वर्ष 2025 मध्ये समूहाची कर्मचारी संख्या 6,67,164 होती, त्यापैकी अंदाजे 43 % जर्मनीमध्ये कार्यरत होते. याचा अर्थ, प्रस्तावित कर्मचारी कपात एकूण कर्मचारी संख्येच्या अंदाजे 15% असू शकते.  ब्लूम यांचा रीस्ट्रक्चरिंग नवीनतम प्रयत्न पुढील महिन्यात सुपरवाइजरी बोर्डसमोर चर्चेसाठी सादर केला जाईल. फोक्सवॅगनच्या योजनांमध्ये वारंवार बदल होत असतात कारण बोर्डाचे निम्मे लेबर रिप्रेजेंटेटिव आहेत. मॅगझिननुसार, त्यांच्या धोरणामध्ये या दशकाच्या अखेरीस सर्वसाधारण खर्च 11 अब्ज युरोने कमी करणे आणि मध्यम मुदतीत जर्मनीमधील चार कारखाने बंद करणे यांचा समावेश आहे. यामध्ये नेकार्सुलम येथील ऑडीचा कारखाना आणि हॅनोव्हर, झ्विकाऊ व एम्डेन येथील फोक्सवॅगनच्या कारखान्यांचा समावेश आहे.

अहवालात म्हटले की,समूहाला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी ब्लूम हे सुटे भाग बनवणारे कारखाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॉक्सवॅगन ब्रँड वेगळे करण्याचा विचार करत आहेत. हा ब्रँड बऱ्याच काळापासून कमी नफ्याचा सामना करत आहेत. फॉक्सवॅगनच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीला “मोठे बदल करावे लागतील.” त्यांनी मॅनेजर मॅगझिनच्या अहवालातील तपशिलावर भाष्य करण्यास नकार दिला. कंपनीला नवीन दिशा देण्यासाठी भविष्यासाठी योजना विकसित करण्याकरिता कंपनीचे कार्यकारी मंडळ गेल्या काही महिन्यांपासून जोमाने काम करत आहे. ऑडी आणि पोर्शेसारख्या आलिशान गाड्या फॉक्सवॅगन ग्रुपद्वारे तयार केल्या जातात, जी एक मोठी जर्मन बहुराष्ट्रीय वाहन निर्मिती कंपनी आहे.

Follow Us