काही मिनिटांतच गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई! कशी? जाणून घ्या

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा शेअर बाजाराला फायदा झाला असून काही मिनिटांत गुंतवणूकदारांची ८ लाख कोटींची कमाई झाली आहे. या तेजीमागची ५ महत्त्वाची कारणे जाणून घ्या.

काही मिनिटांतच गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई! कशी? जाणून घ्या
7 Reasons Driving the Dalal Street Rally
| Updated on: Nov 05, 2026 | 1:02 PM

गुरुवारी भारतीय शेअर बाजारात खूप तेजी दिसून आली. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सची आघाडी, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि इतर सकारात्मक संकेतांमुळे हे घडलं. यामुळे दलाल स्ट्रीटवर तेजीची एक नवीन लाट निर्माण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे २ टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये १,७०० अंशांहून अधिक वाढ होऊन तो ७९,००० अंशांच्या वर पोहोचला आहे. याशिवाय निफ्टी ५० मध्ये सुमारे ५०० अंशांची वाढ होऊन तो २४,४४२ च्या पातळीच्या पुढे गेला आहे. या जबरदस्त तेजीमुळे बीएसईवरील सर्व कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. आता हे एकूण बाजार भांडवल ५०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कोणत्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ?

इंडिगोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. याचे शेअर ६ टक्क्यांहून अधिक वधारले आहे. याव्यतिरिक्त, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एम अँड एम (M&M), एल अँड टी (L&T), अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये २ ते ४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

Loading...

तेलाच्या किमतीही घसरल्या

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण झाली असून हेच दलाल स्ट्रीटवर सुरू असलेल्या तेजीमागे सर्वात मोठे कारण असू शकते. अनेक आठवड्यांनंतर, किमती १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत. ही घसरण सुरूच राहून त्या ९५ डॉलर्स प्रति बॅरलच्याही खाली गेल्या. गुरुवारी सकाळी, ‘ब्रेंट क्रूड’ फ्युचर्स ९४ डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, तर ‘डब्ल्यूटीआय’ (WTI) क्रूड फ्युचर्स ८७ डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली व्यवहार करत होते. आदल्या दिवसाच्या तुलनेत तेलाच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

रुपया दोन आठवड्यांच्या उच्चांकावर!

रुपयाने दोन आठवड्यांच्या उच्चांकावर सुरुवात केली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ०.३ टक्क्यांच्या वाढीसह रुपये ९४.३५ च्या पातळीवर पोहोचला आहे. तेलाच्या किमतीत झालेली घट हे या वाढीमागचे मुख्य कारण ठरले आहे. रुपयाला अधिक आधार मिळू शकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे रुपयाचा कल सकारात्मक राहून तो ९४.५० च्या पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अनेक निर्णयांवर लगाम बसणार?

अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये डेमोक्रॅट्सना मिळालेल्या महत्त्वपूर्ण विजयामुळे अनेक गोष्टी बदलू शकतात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेकदा मनमानी स्वरूपाच्या निर्णयांवर लगाम बसू शकेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना मिळालेला हा धक्का मोठा आहे आणि याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर दिसून येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us