दिवाळीत ‘ड्राय डे’चा काय निमय, किती दिवस मद्याची दुकाने बंद राहणार ?
दिवाळीच्या सणासुदीत तुम्ही कुठे कुटुंबासह फिरायला आणि पार्टीला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी असणार आहे. मद्याच्या विक्रीशी जोडलेले नियम जाणने तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

दिवाळीच्या सणासुदीत तुम्ही कुठे कुटुंबासह फिरायला जाण्यास आणि पार्टी जाण्याची योजना बनवत आहात, तर मद्याच्या विक्रीशी जोडलेले नियम जाणने तुमच्यासाठी गरजेचे आहे. यावर्षी ८ नोव्हेंबर २०२६ ला दिवाळीच्या दिवशी दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. या दरम्यान सरकारी आणि खाजगी दुकानांवर टाळे लागलेले असेल. या देशी देशी आणि विदेशी मद्य विक्री तसेच बिअर देखील खरेदी करता येणार नाही. कारण ८ नोव्हेंबरला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ड्राय-डे असणार आहे.
ड्राय-डेचा परिणाम केवळ मद्याच्या दुकानांपर्यंत मर्यादित असणार नाही. तर वेग-वेगळ्या राज्यातील बार,पब, रेस्टॉरंट आणि हॉटलसाठी नियमात देखील काही अंतर असू शकते. दिवाळी शिवाय नोव्हेंबर आणि डिसेंबरात गुरुनानक जयंती आणि ख्रिसमस सारख्या सणाला अनेक राज्यात मद्याची विक्री बंद असणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही बाहेर जाण्याचा किंवा पार्टी करण्याची योजना आखत असलाल तर आपल्या राज्याच्या ड्राय डेच्या नियमांची माहिती करुन घ्या.
दिवाळीत दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्र नियम नियम ?
दिल्ली आणि यूपीत 8 नोव्हेंबरात दिवाळीच्या निमित्त रिटेल मद्य विक्रीची दुकाने, सरकार मान्य दारुची दुकाने आणि सामान्य बार बंद असणार आहे. उत्तर प्रदेशातही या दिवशी इंग्रजी आणि देशी मद्यासह बिअरची विक्री होणार नाही. महाराष्ट्रात मद्याची सरकारी दुकाने, वाईन शॉप आणि बार बंद रहातील.
वास्तविक, बार, पब आणि रेस्टॉरंटमध्ये दारु विक्रीवरही बंदी लागू रहाणार आहे. सामान्य बार आणि रेस्टॉरंट मध्ये ही या दिवशी दारु विकली जाणार नाही. मात्र, काही विशेष लायसन्स असणाऱ्या 4 आणि 5 स्टार हॉटलना तेथे उतरलेल्या त्यांच्या पाहूण्यांना रुम सर्व्हीस द्वारे मद्य देण्याची सूट आहे. परंतू यासाठी संबंधित राज्याचे अबकारी नियम आणि लायसन्सच्या अटी लागू असतील.
नोव्हेंबर आणि डिसेंबर केव्हा असणार ड्राय डे ?
दिवाळीच्या शिवाय दिल्ली आणि उत्तर प्रदेशात २४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुरु नानक जयंतीच्या मुहूर्तावर मद्याची दुकाने बंद असणार आहे. तसेच २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी या दोन्ही राज्यात मद्य विक्रीवर बंदी असणार आहे.
महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला मद्याची दुकाने बंद होती आणि आात ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी लक्ष्मी पुजनानिमित्त दारुची दुकाने बंद असतील. हरियाणा आणि मध्य प्रदेशासह अन्य राज्यातही दिवाळीत धार्मिक सुट्ट्यामुळे मद्याच्या विक्रीवर बंदी असणार आहे.
धनतेरस आणि भाऊबिजेला दुकाने उघड असणार ?
धनतेरस, गोवर्धन पूजा आणि भाऊबिजेच्या दिवशी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मद्याची दुकाने नेहमी प्रमाणे उघडी राहतील. या दिवशी ड्राय डे जाहीर केलेला नाही.