ETF Investment : सोन्यापेक्षाही जास्त रिटर्न्स, Silver ETF मध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर फायदे; समजून घ्या कसं शक्य?

सध्या सोने आणि चांदीचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याच्या वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे. सिल्व्हर ईटीएफ हा देखील असाच एक चांगला पर्याय आहे.

ETF Investment : सोन्यापेक्षाही जास्त रिटर्न्स, Silver ETF मध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर फायदे; समजून घ्या कसं शक्य?
Silver ETF
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 25, 2026 | 9:37 PM

What Is Silver ETF : सध्या सोने आणि चांदीची किंमत चांगलीच वाढत आहे. सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या पुढे तर चांदीचा भाव हा साडेतीन लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळेच आता ज्या लोकांनी दोन किंवा एक वर्षापूर्वी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक केलेली आहे, आज ते मालामाल झाले आहेत. भविष्यातही सोने आणि चांदीचा भाव असाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे आता गुंतवणूकदार तसेच सामान्य लोक सोने आणि चांदीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करत आहेत. असे असतानाच आता Silver ETF ची पुन्हा एकदा चर्चा चालू झाली आहे. Silver ETF मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. त्यामुळेच Silver ETF म्हणजे नेमकं काय? तुम्हाला Silver ETF मध्ये कशी गुंतवणूक करता येऊ शकते? हे समजून घेऊ या…

Silver ETF म्हणजे काय?

आजकाल Silver ETF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. Silver ETF हा एका प्रकारचा म्युच्यूअल फंड असतो. Silver ETF च्या माध्यमातून तुम्ही चांदीमध्ये गुतवणूक करू शकता. Silver ETF मध्ये गुंतवणूक करून तुम्ही एका प्रकार शेअर बाजारातच गुंतवणूक करत असता. चांदीचे बिस्कीट, नाणे किंवा चांदीचे दागिने खरेदी न करता तुम्हाला Silver ETF च्या माध्यमातून चांदीमध्ये गुंतवणूक करता येते. Silver ETF हे शेअर बाजाराशी निगडीत असते. चांदीचा भाव वाढला की Silver ETF चे मूल्यदेखील वाढते. तसेच चांदीचा भाव कमी झाला की Silver ETF चे मूल्य कमी होते.

Silver ETF नेमके काम कसे करते?

Silver ETF च्या माध्यमातून तुम्ही थेट चांदीमध्ये गुंतवणूक करता. तुम्ही Silver ETF च्या माध्यमातून पैसे गुंतवले की चांदीच्या भावानुसार तुम्हाला काही युनिट्स दिले जातात. चांदीचा भाव वाढला की या युनिट्सचे मूल्य वाढते. चांदीचा भाव कमी झाला की तुमच्या खात्यात असलेल्या यूनिट्सचे मूल्य कमी होते. दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, करणाऱ्यांसाठी Silver ETF हा एक चांगला पर्याय आहे. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात चांदीचा भाव वाढू शकतो. त्यामुळे Silver ETF च्या माध्यमातून गुंतवलेल्या तुमच्या पैशांचे मूल्य वाढू शकते.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)