AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : काही राज्यांनी लागू केला सेस, आज तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात चढउतार सुरु आहे. काल किंमती 2 डॉलरने कमी झाल्या. आज त्यात पुन्हा वाढ झाली. पण गेल्या महिन्याभरापासून या किंमतीत फार मोठी वाढ झालेली नाही. पण राज्या-राज्यात शुल्क आकारण्याचा पद्धतीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तफावत दिसून येते.

Petrol Diesel Price : काही राज्यांनी लागू केला सेस, आज तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय
आजचा भाव काय
| Updated on: Feb 24, 2023 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) पुन्हा वधारले. गुरुवारी या किंमतीत घसरण झाली होती. कच्चा तेलाच्या भावात चढउतार सुरु आहे. काल किंमती 2 डॉलरने कमी झाल्या. आज त्यात पुन्हा वाढ झाली. पण गेल्या महिन्याभरापासून या किंमतीत फार मोठी वाढ झालेली नाही. ब्रेंट क्रूड ऑईल कालच्या 80.67 वरुन आज 82.27 डॉलर प्रति बॅरल झाले. तर डब्ल्यटीआई ऑईलमध्ये 0.34 टक्क्यांची वाढ होऊन ते 75.65 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. या किंमतींआधारे देशातील तेल विपणन कंपन्या सकाळीच पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट करतात. राज्या-राज्यात शुल्क आकारण्याचा पद्धतीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) तफावत दिसून येते.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारत विविध देशाकडून, आता रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल आयात करत असल्याने आंतरराष्ट्रीय धोरणाचा मोठा परिणाम दिसून येणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती.

हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला. हा सेस 2 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....