क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

| Updated on: Jun 04, 2021 | 9:55 AM

जर तुम्ही बिल भरण्यास सक्षम नसाल तर तुम्ही काय करु शकता, याची माहिती असणे गरजेचे आहे. (What Should You Do If You Can't Pay Your Credit Card Bill)

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या
credit-card
Follow us on

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. लॉकडाऊनमध्ये झालेली पगार कपात किंवा कमी उत्पन्न यामुळे त्यांना ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल इत्यादी वेळेवर भरता आलेले नाही. यामुळे काही बँका ग्राहकांवर वेगवेगळ्या कारवाई करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहे, यात क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्याच्या नावाखाली ग्राहकांसोबत गैरवर्तवणूक केली जात आहे. (What Should You Do If You Can’t Pay Your Credit Card Bill)

त्यामुळे अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास वसुलीच्या नावाखाली एजंट कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतात किंवा तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल मर्यादेच्या आत भरण्यास सांगितले जाऊ शकते? याबाबतचे ग्राहकांचे नेमके अधिकार काय असतात, तसेच जर तुम्ही बिल भरण्यास सक्षम नसाल तर तुम्ही काय करु शकता, याची माहिती असणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत नसाल तर काय?

जर ग्राहक वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर बँक त्यांच्यावर बर्‍याच प्रकारे कारवाई करू शकते. तसेच बँक कायदेशीररित्या ग्राहकांविरूद्ध तक्रार दाखल करु शकते. त्यामुळे तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. जर एखादा ग्राहक क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर त्याला सर्वप्रथम डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर त्याचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले जाते.

यानंतरही जर त्याने बिल भरले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येऊन बिलाची वसूली करतो. यामुळे तुमच्या सिबिल स्कोर वर परिणाम होतो.

ग्राहकांचे अधिकार काय?

?जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल बाकी असल्यात तुम्ही सर्वप्रथम त्याची कमीत कमी रक्कम देऊ शकता. दर तुम्ही ते करण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही ग्राहक सेवा अधिकाऱ्याची मदत घ्या. यानंतर तुम्हाला काही पर्याय आणि वेळ मिळू शकतो. ज्याद्वारे तुम्ही सहज क्रेडिट कार्डचे बिल भरु शकता.

?जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सक्षम नसाल, तर कोणताही बँक कर्मचारी तुम्हाला धमकी देऊ शकत नाही. तसेच तुमचे शारीरिक नुकसान करू शकत नाही. त्याशिवाय तुमच्यासोबत सामाजिक आणि सार्वजनिकरित्या गैरवर्तन करू शकत नाही.

?कित्येदा क्रेडिट कार्डच्या बिलाच्या वसूलीसाठी काही तृतीयपंथीय लोकांना पाठवले जाते. मात्र ते देखील तुम्हाला केवळ कर्ज परत करण्याबाबतच सांगू शकतात. तसेच, हे लोक फक्त दिवसा तुमच्याकडे येऊ शकतात. रात्रीच्यावेळी तुमच्याकडे कोणीही व्यक्ती येत नाही. त्यांना त्यांच्या काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत.

?जर तुम्ही क्रेडिट कार्डचा हप्ता भरण्यास सक्षम नसाल, तर प्रथम आपल्याला बँकेकडून काही नोटीसा दिल्या जातात. तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. तसेच रिकव्हरी एजंटही तुम्हाला काही दिवसांचा कालावधी देतो.

?यानंतरही तुम्ही बिल न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. ज्यात तुमची संपत्ती गहाण ठेवणे, त्याचा लिलाव केला जातो. ज्याद्वारे बँक त्यांची थकबाकी वसूल करते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत करते. (What Should You Do If You Can’t Pay Your Credit Card Bill)

संबंधित बातम्या : 

केवळ 1 रुपयात एक किलो साखर, गव्हाचे पीठ, बदाम आणि बरंच काही, नेमकी ऑफर काय?

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख रुपये

Salary Hike : पगार वाढल्यानंतर लगेचच करा ‘ही’ कामं, पगारवाढीचा आनंद होईल दुप्पट