पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख रुपये

Namrata Patil

|

Updated on: Jun 04, 2021 | 7:51 AM

या योजनेत तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळेल. (Post Office Recurring Deposit Schemes)

पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा पैसे, 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख रुपये
post office scheme 2021

मुंबई : बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसमधील विविध योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते. पोस्ट ऑफिस आपल्याला अनेक प्रकारच्या लहान बचत योजना (Small Savings Schemes) देते. यातील एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिट योजना (Post Office Recurring Deposit) आहे. ज्याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Post Office Investment Post Office Recurring Deposit Schemes)

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office RD) ही योजना तुम्ही लहान बचतीसह सुरु करु शकता. हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे. तसेच या योजनेतील दुसरी चांगली बाब म्हणजे तुम्हाला तुमच्या बचतीच्या सुरक्षिततेची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही दर महिना किमान 1000 रुपये देखील यात गुंतवू शकता. तसेच पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकीस कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळेल.

व्याजदर किती?

पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट खाते हे किमान 5 वर्षांसाठी उघडता येते. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी तुम्ही हे खाते उघडू शकत नाही. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी सर्व लहान बचत योजनांचे व्याज दरात सुधारणा करते. सध्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (PO RD Interest Rate) वर 5.8 टक्के व्याज दर उपलब्ध आहे.

10 वर्षानंतर मिळतील 16 लाख

जर तुम्ही सध्याच्या व्याज दरावर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवले, तर तुम्हाला 10 वर्षानंतर 16 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळेल. या दहा वर्षात दर महिना 10 हजार रुपयांच्या बचतीनुसार तुम्ही 12,00,000 रुपयांची बचत करु शकता. या दरम्यान, तुम्हाला 5.8 टक्के दराने 4,26,476 रुपये व्याज मिळेल. त्यामुळे तुमची एकूण रक्कम ही 16,26,476 रुपये होईल.

‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

पण जर तुम्हाला काही कारणात्सव रिकरिंग डिपॉज‍िटचा हप्ता भरता आला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच या हप्त्यास उशीर झाल्यास दरमहा एक टक्का दंड आकारला जातो. तसेच जर एखाद्या व्यक्तीने सलग 4 महिने हा हप्ता जमा केला नाही तर त्याचे खाते बंद केले जाऊ शकते. पण हे खाते बंद झाल्यानंतरही ते पुन्हा सुरु करता येते. (Post Office Investment Post Office Recurring Deposit Schemes)

संबंधित बातम्या : 

एलआयसीकडे तुमचे पैसे आहेत, पण तुम्हाला ठाऊक नाही; जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुमची रक्कम

LIC IPO: ‘या’ महिन्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता, लिस्टिंगनंतर कंपनी यादीत रिलायन्सला टाकेल मागे

Salary Hike : पगार वाढल्यानंतर लगेचच करा ‘ही’ कामं, पगारवाढीचा आनंद होईल दुप्पट

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI