LIC IPO: ‘या’ महिन्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता, लिस्टिंगनंतर कंपनी यादीत रिलायन्सला टाकेल मागे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 03, 2021 | 8:15 PM

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येत्या काही आठवड्यांत सरकार यासंदर्भात निमंत्रण पाठवेल. पण एलआयसी आयपीओसंदर्भात मार्च 2022 पर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशीही एक अटकळ बांधली जात आहे. Life Insurance Corporation Lic Ipo

नवी दिल्लीः एलआयसीच्या आयपीओकडे सर्व जणांचे डोळे लागले आहेत. तसेच सरकार एलआयसीच्या IPO संदर्भात या महिन्यात गुंतवणूक बँकांकडून प्रस्ताव मागवू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येत्या काही आठवड्यांत सरकार यासंदर्भात निमंत्रण पाठवेल. पण एलआयसी आयपीओसंदर्भात मार्च 2022 पर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशीही एक अटकळ बांधली जात आहे. (Life Insurance Corporation Lic Ipo News Investment Banks May Submit Proposals In June Modi Govt)

निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपये

विशेष म्हणजे LIC चा आयपीओ हा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असेल, असे मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपये ठेवले. यात एलआयसी आयपीओ व्यतिरिक्त एअर इंडिया आणि बीपीसीएलच्या विक्रीचा समावेश आहे. जेफरीज इंडियाचे प्रमुख प्रखर शर्मा यांच्या मते, एलआयसीचे मूल्यांकन अंदाजे 261 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 19 लाख कोटी रुपये असू शकते. अशा परिस्थितीत सूचीबद्धतेसह एलआयसी ही देशातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरेल. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्या जवळपास 199 अब्ज डॉलर्स इतके आहे.

439 अब्ज डॉलरची मालमत्ता

एलआयसीच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास 2019-20 या आर्थिक वर्षातील त्याची एकूण मालमत्ता 439 अब्ज डॉलर्स होती. जीवन विमा क्षेत्रात बाजारातील हिस्सा 69 टक्क्यांच्या जवळपास आहे.

8 कंपन्यांमधील आपला संपूर्ण हिस्सा विकला

जीवन विमा कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसी आयपीओपूर्वी काही मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. मार्च तिमाहीत एलआयसीने 8 कंपन्यांमधील आपला संपूर्ण हिस्सा विकला. एलआयसी हा देशातील सर्वात मोठा संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. सार्वजनिक व्यापार असलेल्या कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यातील त्यांचा वाटा फक्त 3.66 टक्क्यांपर्यंत खाली आलाय, जी आतापर्यंतची सर्वात निम्न पातळी आहे. प्राईम डेटाबेसने ही माहिती दिली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत निफ्टीमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामुळे एलआयसीने मोठा नफा कमावला आहे.

भागभांडवल शून्यावर आणलेल्या दहा कंपन्यांविषयी

एलआयसीने आपले भागभांडवल शून्यावर आणलेल्या दहा कंपन्यांविषयी माहिती दिलीय. सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील त्याचा हिस्सा 4.20 टक्के होता, जो आता शून्यावर आला. त्याखालोखाल हिंदुस्तान मोटरचा 3.56 टक्के हिस्सा, युनियन बँक ऑफ इंडियाचा 3.22 टक्के हिस्सा, ज्योती स्ट्रक्चर्सचा 1.94 टक्के हिस्सा, मॉर्पेन लॅबचा 1.69 टक्के हिस्सा, आरपीएसजीचा 1.66 टक्के, Insecticides India मध्ये 1.50 टक्के हिस्सा होता. दालमिया भारती शुगरमधील 1.50 टक्क्यांची भागीदारी विकून शून्यावर आणलीय. टक्केवारीच्या आधारे ही सर्वात मोठी घसरण यादी आहे.

मूल्याच्या आधारावर सर्वात मोठी घट

मूल्यांच्या दृष्टीने एलआयसीने HDFC मधील कमाल भागभांडवल कमी करून 2095 कोटी, मारुती सुझुकीची 1181 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाची 651 कोटी, कोटक महिंद्रा बँकेतील 542 कोटी आणि एशियन पेंट्सची 463 कोटी भागीदारी या तिमाहीत घटवलीय.

संबंधित बातम्या

44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; SBI कडून पैसे काढण्याच्या नियमांत बदल, आता ‘एवढेच’ पैसे काढता येणार

EPFO चा मोठा निर्णय, 1 जूनपूर्वीच करा हे काम, अन्यथा खात्यात पैसे जमा होणार नाहीत

Life Insurance Corporation Lic Ipo News Investment Banks May Submit Proposals In June Modi Govt

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI