नीता अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची मालक, अशी देते टक्कर

Neeta Ambani- Roshni Nadar Richest Women: भारताच्या सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत, नीता अंबानी यांना मागे टाकत या महिलेने बाजी मारली आहे. ती देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे. या उद्योगपती महिलेच्या नावावर किती आहे एकूण संपत्ती?

नीता अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची मालक, अशी देते टक्कर
नीता अंबानी, रोशनी नाडर
| Updated on: Sep 27, 2026 | 9:54 AM

प्रमख्यात HCL कंपनीच्या मालक रोशनी नाडर-मल्होत्रा भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती 2.79 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी रात्रीतूनच आशियातील सर्वात श्रीमंत महिला होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता. ब्लूमबर्ग बिलिनिअर्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एचसीएल समूहाचे संस्थापक शिव नाडर यांनी मुलगी रोशनी नाडर यांना एचसीएलमध्ये 47 टक्क्यांची भागीदारी दिली होती. हा वाटा मिळताच रोशनी या कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर ठरल्या. त्यासोबतच त्या रात्रीतूनच आशियातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती ठरल्या. एकूण संपत्तीत रोशनी यांनी अंबानी कुटुंबियांना म्हणजे नीता अंबानी यांना सुद्धा पिछाडीवर टाकले आहे.

रोशनी नाडर यांनी नीता अंबानींना टाकले मागे

नीता अंबानी यांना रोशनी नाडर यांनी संपत्तीत मागे टाकले आहे. दाव्यानुसार, नीता अंबानी यांची एकूण संपत्ती ही 2500 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. तर हुरून इंडिया रिच लिस्टनुसार, रोशनी नाडर मल्होत्रा यांची एकूण संपत्ती 2.79 लाख कोटी रुपये म्हणजे जवळपास 33.5 अब्ज डॉलर इतकी आहे. रोशनी या संपत्ती नीता अंबानी यांच्यापेक्षा पुढे गेल्याचे समोर आले आहे. त्यांनी सावित्री जिंदाल, अजिज प्रेमजी यांना सुद्धा मागे टाकले आहे. अर्थात अंबानी आणि अडाणी यांची एकूण संपत्ती त्यांच्यापेक्षा खूप अधिक आहे.

गेल्यावर्षी 31,30,31,34,67,080 रुपयांच्या मालक

गेल्यावर्षी त्यांच्या वडिलांकडून कंपनीत वाटा मिळाल्यानंतर रोशनी नाडर-मल्होत्रा यांच्याकडे वामा दिल्ली कंपनीत 12.94 टक्के वाटा आणि एचसीएल कॉर्पमध्ये 49.94 टक्के वाटा मिळाला. त्यांची एकूण संपत्ती 35.9 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 31,30,31,34,67,080 रुपये इतकी झाली .

रोशनी नाडर यांचा परिचय?

रोशनी नाडर, एचसीएल कंपनीच्या संस्थापक शिव नाडर यांची मुलगी आहे. त्यांनी 2020 मध्ये एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीची जबाबदारी सांभाळली होती. खाद्या सूचीबद्ध आयटी कंपनीच्या महिला अध्यक्ष असण्याचा मान त्यांनी पटकावला. रोशनी नाडर यांनी पत्रकार म्हणून करियरची सुरुवात केली. त्यांनी नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंवादाची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सीएनएन आणि स्काय न्यूजसारख्या मोठ्या मीडिया हाऊसमधून पत्रकार म्हणून काम केले. न्यूज प्रोड्यूसर म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्या कुटुंबाच्या व्यवसायाकडे वळल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us