सोन्याचे दागिने बनवणारे कारागिर कपडे का जाळतात ? काय आहे यामागचे कारण
सोन्याचे दर अवाच्या सवा झालेले आहेत. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरत आहे. दागिने घडवणारे कारागिर सोन्याचे दागिने तयार केल्यानंतर त्यांचे कपडे जाळत असतात. काय आहे या मागचे कारण ?

सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. एखादा दागिने तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. अशात सोन्याचे दागिने तयार करणारे कारागिरही प्रत्येक ग्रॅम सोन्याचा चांगल्या प्रकारे वापर करतात आणि अगदी नाजूकपणे गोल्ड ज्वेलरी तयार करतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? हे ज्वेलर्स दागिने तयार करताना जो कपडा वापरतात, त्यांना काम संपल्यानंतर जाळून टाकतात. एवढेच काय ज्या कपड्याने मशिन आणि टेबल स्वच्छ करतात, त्या कपड्यालाही ते सांभाळून ठेवतात आणि नंतर तो कपडाही जाळतात.एवढेच नाही तर जेथे दागिने घडवले जातात तेथील कारपेट देखील एका काळानंतर जाळले जाते.
तुम्ही विचार करत असाल की हे दागिने कारागिर असे का करत असतील आणि या कपड्यांना फेकण्या ऐवजी का जाळत असतील. तर समजून घेऊयात अखेर हे दागिने कारागीर का करतात ?
वास्तविक या गोष्टीचा खुलासा सोने कारागिरी लोकांनी स्वत: केला आहे. दागिने तयार करताना कारागिर स्वत:चे कापड, कारपेट, चादर जुनी झाल्यानंतर फेकून न देता ती जाळतात. मात्र, दागिने कारागिर त्यांचे कपडे जाळण्यामागे कारण काय ?
कपडे का जाळतात कारागिर ?
दागिने ज्या कपड्याच्या मदतीने दागिने घडवतात त्या कपड्यांना कामानंतर फेकून न देता जाळतात. या मागे कारण काय तर कारण अगदी साधे आहे. सोन्याला दागिन्यात घडवताना अनेकदा त्याचा आकार बदलावा लागतो. वेगवेगळा आकार देताना आणि कोरीव काम करत असताना सोन्याचे कण या कपड्यांना लागत असतात. तसेच हे सोने जमीनीच्या कारपेटवर देखील पडते.
अशात कारागिर ठराविक वेळानंतर मशीन आणि आजूबाजीची जागा स्वच्छ करताना कापडाचा वापर करत असतात. या कपड्यांना ते सुरक्षित ठेवत असतात. नंतर काही काळानंतर या कपड्यांना जाळून त्यात अडकलेले सोने काढतात. त्यामुळे ते कारपेट आणि चादरींना जाळतात. ज्यावर ते बसतात.
या कपड्यातून किती सोने निघते ?
जेव्हा कारागिरांना विचारले गेले की या अशा कपड्यांना जाळल्याने किती सोने मिळते. तेव्हा त्यांना सांगितले की एक वर्षात सुमारे १० ग्रॅम सोने या कपड्यातून जमा होते. या वरुन तुम्हाला अंदाज येईल की खराब कपड्यांमध्येही किती सोने लपलेले असते, याच कारणामुळे सोने कारागिर वारंवार मशिनींना स्वच्छ करत असतात.