PF चा पैसा काढा झटपट! EPFO ची ATM आणि UPI सेवा कधी सुरू होणार, मोठी अपडेट वाचली का?
EPFO PF Withdraw ATM And UPI: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) PF काढण्यासाठी EPFO 3.0 सिस्टिम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर सदस्यांना ATM आणि UPI च्या माध्यमातून पीएफची रक्कम काढता येईल.

EPFO PF Withdraw: घर खर्च अथवा लग्न कार्यासाठी, उपचारांसाठी पैसे लागत असतील तर आता कुणाकडे हात पसरवण्याची गरज नाही वा उधार मागण्याची मोठी गरज भासणार नाही. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक क्रांतीकारक अपडेट दिली आहे. EPFO 3.0 ही सिस्टिम लवकरच कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या सेवेत दाखल होत आहे. केवळ पीएफ रक्कम काढण्याची (PF Withdrawal New Rules) प्रक्रिया सोपी होणार नाही. तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा मोठा फरक पडेल. जाणून घ्या काय आहे EPFO 3.0 आणि त्याचा कसा लाभ मिळेल?
EPFO 3.0: जुन्या पद्धतीपेक्षा किती वेगळे?
EPFO तुमच्या पगारातून कपात होणाऱ्या रक्कमेचे नियोजन करते. त्यामुळे निवृत्तीवेळा तुम्हाला एक मोठी रक्कम मिळते. EPFO 3.0 ही आता अत्याधुनिक आणि हायटेक तांत्रिक पद्धत आहे. 7.8 कोटी सदस्यांसाठी ही नवीन पद्धत गेमचेंजर ठरणार आहे.
काय काय झाला बदल?
दाव्यांचा झटपट निपटारा: पूर्वी ऑटो सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपये होती. ती वाढून आता 5 लाख रुपये इतकी करण्यात येणार आहे.
वेळेची होणार बचत : यापूर्वी क्लेम सेटलमेंट आणि पैसा मिळण्यासाठी जवळपास एक महिना लागत होता. आता या प्रक्रियेमुळे 2 ते 5 दिवसात पैसे खात्यात येतील.
पेपरलेस प्रक्रिया: आधार पडताळा झाल्याने आता इतर कागदी घोडे नाचवायची गरज नाही. पासबुक अपलोड करण्याची गरज नाही.
कंपनीच्या मंजुरीची गरज नाही : आता KYC अपडेट करण्यासाठी वा पीएफ दाव्यासाठी कंपनी, मालकाच्या मंजूरीची गरज नाही.
आता 13 नाही केवळ 3 श्रेणीत मिळेल पैसा : EPFO ने अडथळ्यांची शर्यत बाजूला करत पीएफ काढण्यासाठीच्या
13 जुन्या श्रेणी हटवल्या. त्यांना आता 3 सहज आणि सोप्या श्रेणीत विभाजीत केले.
अत्यावश्यक (Urgent): आजारपण, रुग्णालय उपचार, लग्न आणि शिक्षणासाठी
घर खरेदी (Housing): घर खरेदीसाठी अथवा गृहकर्ज चुकते करण्यासाठी
खास परिस्थिती: बेरोजगारी अथवा निवृत्तीसाठी पैसा
ATM आणि UPI च्या माध्यमातून पीएफ
EPFO 3.0 मध्ये ATM आणि UPI च्या माध्यमातून पीएफ काढण्याची सुविधा हा सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून दीर्घकाळ वाट पाहावी लागत होती. पण आता EPFO Withdrawal Card च्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने पीएफ काढता येईल. हे एटीएम कार्डसारखे काम करेल. तुमचा पैसा थेट एटीएम मशीनमधून बाहेर येईल. तर पीएफ खाते गुगप पे, फोनपे वा इतर युपीआय प्लॅटफॉर्मशी कनेक्ट करून पीएफ रक्कम काढता येईल.