यात्रा ऑनलाइन लवकरच घेऊन येतेय स्वतः चे IPO, सेबी पुढे मांडला प्रस्ताव!

| Updated on: Mar 26, 2022 | 9:11 PM

यात्रा सेवा देणारी कंपनी यात्रा ऑनलाइन लिमिटेड ने इनीशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आणण्यासाठी बाजार नियामक सेबी पुढे प्रास्ताविक कागदपत्र सादर केले आहे.या आयपीओ दरम्यान कंपनी 750 कोटी रुपयांचे शेअर जारी करेल.

यात्रा ऑनलाइन लवकरच घेऊन येतेय स्वतः चे  IPO, सेबी पुढे मांडला प्रस्ताव!
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: file
Follow us on

यात्रा ऑनलाइन लिमिटेड ने इनीशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आणण्यासाठी बाजार नियामक सेबी पुढे प्रास्ताविक कागदपत्र सादर केले आहे. या आयपीओ दरम्यान कंपनी 750 कोटी रुपयांचे शेअर जाहीर करणार आहे.सिक्योरिटीज एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Sebi) समोर सादर केलेल्या कागद पत्रानुसार,यात्रा ऑनलाइन लिमिटेड (Yatra online limited) आयपीओ द्वारे मिळणारी रक्कम रणनीती गुंतवणूक,अधिग्रहण आणि व्यवसाय वाढवण्यासाठी करेल. यात्रा ऑनलाइनची मूळ कंपनी यात्रा ऑनलाइन इंक अमेरिकी बाजार नैसडेक मध्ये लिस्टेड आहे. या आयपीओ दरम्यान कंपनी लवकरच 750 कोटी रुपयांचे नवीन शेअर जाहीर करेल याशिवाय 93,28,358 इक्विटी शेअरची सेलिंग ऑफर चा देखील समावेश करण्यात येईल.ऑफर फॉल सेल अंतर्गत कंपनी टीएचसीएल ट्रॅव्हल्स होल्डिंग्स साइप्रस लिमिटेड चे 88,96,998 इक्विटी शेअर आणि पंडारा ट्रस्ट चे 4,31,360 इक्विटी शेअरचे विक्री करेल.

LIC ने सादर केला नवीन ड्राफ्ट प्रोस्पेक्टस

आपणास सांगू इच्छितो की, लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन कडून एलआईसी आयपीओ संबधित मार्केट रेग्युलेटर सेबी समोर नवीन  DRHP अहवाल सादर केला. रिपोर्ट नुसार एलआयसी ने डिसेंबर त्रैमासिक आधारावर नवीन डीआरएचपी अहवाल सादर केला आहे.जुन्या DRHP ला परवानगी मिळाली होती त्यानुसार 12 मे पर्यंत एलआयसी आयपीओ आणू शकते. यानंतरच सेबी समोर कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता भासेल. 13 फेब्रुवारीला एलआयसी आयपीओ साठी DRHP अहवाल जमा केला गेला होता यावेळी शेअर बाजारांमध्ये खूपच चढ-उतार पाहायला मिळाले अशातच सरकारला थोडावेळ थांबू इच्छिते आहे, जेणेकरून भविष्यात बंपर यश मिळू शकेल. या प्रकरणी सरकार कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाही.

कंपनीच्या फायद्यात वाढ

डिसेंबर त्रैमासिक मध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या एकंदरीत घडामोडी बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचे नेट प्रॉफिट वाढून 234.9 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचे नाईट प्रॉफिट सर्वसाधारणपणे 90 लाख रुपयांपर्यंत होते फर्स्ट इयर प्रीमियम वाढून 8748.55 कोटी रुपयांवर पोहोचला जी डिसेंबर 2020 मासिक मध्ये 7957.37 कोटी रुपये एवढा होता. रिन्यूअल प्रीमियम वाढून 56822 कोटी इतक्या रुपयांवर पोहोचला.डिसेंबर त्रिमासिक मध्ये टोटल प्रेमियम 97761 कोटी रुपये असून जे एक वर्ष अगोदर 97008 कोटी रुपये एवढा होता. एलआयसी आयपीएलला उद्देशून रिझर्व बँक ऑफ इंडिया ने म्हटले आहे की, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आयपीओ असेल अशातच या आयपीओ ला योग्य वेळेवर लॉन्च करणे खूपच गरजेचे आहे.

इतर बातम्या

Nitin Gadkari : पुण्याच्या शिरुर ते वाघोलीमध्ये तीन मजली रस्ता बांधणार, नितीन गडकरींनी प्लॅन सांगितला

मोबाईलवर बसला म्हणून दिव्यांगाला बेदम मारहाण, कुठं घडला अमानुष प्रकार?