Agniveer Recruitment 2023: रेल्वेच्या भरतीत अग्निवीरांना मिळणार आरक्षण, वाचा कोणत्या पदासाठी किती आरक्षण?

रेल्वे भरतीत आता माजी अग्निवीरांना आरक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांना पीईटी परीक्षेतून सूट देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे आपल्या भरतीत 15 टक्के पदे अग्निवीरांसाठी राखीव ठेवणार आहे. यासंदर्भात रेल्वेकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने बीएसएफ भरतीत माजी अग्निवीरांना 10 टक्के पदे राखीव ठेवण्याची घोषणा केली होती.

Agniveer Recruitment 2023: रेल्वेच्या भरतीत अग्निवीरांना मिळणार आरक्षण, वाचा कोणत्या पदासाठी किती आरक्षण?
Agniveer scheme
| Updated on: May 12, 2023 | 12:05 PM

मुंबई: रेल्वे भरतीत आता माजी अग्निवीरांना आरक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांना पीईटी परीक्षेतून सूट देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे आपल्या भरतीत 15 टक्के पदे अग्निवीरांसाठी राखीव ठेवणार आहे. यासंदर्भात रेल्वेकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने बीएसएफ भरतीत माजी अग्निवीरांना 10 टक्के पदे राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. निमलष्करी दलातील माजी अग्निवीरांच्या भरतीसाठी ही स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नुकतीच संसदेत ही माहिती दिली. लाइव्ह हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, लेव्हल-1 चतुर्थ श्रेणी पदांमध्ये माजी अग्निवीरांना 10 टक्के आणि लेव्हल-2 पदांमध्ये 5 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.

वयोमर्यादाही शिथिल होणार

रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये माजी अग्निवीरांना पहिल्या तुकडीला वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर माजी अग्निवीरांच्या दुसऱ्या माजी तुकडीला वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

तुम्हाला पीईटी परीक्षा द्यावी लागणार नाही

रेल्वेकडून या भरतीत लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी अर्ज करणाऱ्या माजी अग्निवीर कर्मचाऱ्यांना पीईटी परीक्षा द्यावी लागणार नाही. माजी अग्निवीरांना केवळ लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

कोणत्या भरतीत माजी अग्निवीरांना मिळणार आरक्षण?

बीएसएफभरतीत माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. आता रेल्वेमध्ये लेव्हल-1 पदांच्या भरतीत 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये चार वर्षांसाठी युवकांची भरती करण्यासाठी गेल्या वर्षी अग्निवीर योजना सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत अग्निवीरांची भरती केली जात आहे.