AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026:रोहित-विराटच नाही, तर हे 7 दिग्गज टीम इंडियाच्या बाहेर, T20 विश्वचषकासाठी नाही झाली निवड

T20 World Cup 2026: समय बडा बलवान है चाचा, असं तुम्ही कुठं तरी ऐकलं असेलच. असं म्हणतात की वेळ ही शिखरावर पोहचवते तर ती कधी ना कधी खाली पण खेचते. टीम इंडियातील या 7 खेळाडूंकडे पाहून अनेकांना याची आठवण येत आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीच नाही तर या खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

T20 World Cup 2026:रोहित-विराटच नाही, तर हे 7 दिग्गज टीम इंडियाच्या बाहेर, T20 विश्वचषकासाठी नाही झाली निवड
टी२० विश्वचषक २०२६Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 20, 2025 | 4:16 PM
Share

T20 World Cup 2026: आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाची, भारतीय संघाची घोषणा आज शनिवारी, 20 डिसेंबर रोजी झाली. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याच्या स्क्वॉडची घोषणा केली. एका पत्रकार परिषदेत टीम इंडियातील दिग्गजांची नावं जाहीर झाली. पण टी20 वर्ल्ड कप 2024 चा विजेत्या संघातील अनेक नामचीन या नवीन संघात नाहीत. आगामी टी20 विश्वचषकासाठी ते टीम इंडियाचा भाग नसतील. मागील विश्वविजेत्या संघातील 7 खेळाडूंना नवीन संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. तर इतर सदस्य हे गेल्या वर्षीच्या विश्वविजेत्या संघात खेळले होते. पण त्यांनाही निवडकर्त्यांनी यावेळी संधी दिली नाही. कोणते आहेत ते खेळाडू?

अंतिम 15 खेळाडूंमध्ये पण नाही स्थान

टी20 वर्ल्डचषक 2024 साठी निवडण्यात आलेल्या अंतिम 15 मधील 7 सदस्य नवीन विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात नसतील. एखाद्याला राखीव खेळाडू म्हणून कदाचित संधी मिळेलही, पण तो अंतिम 15 खेळाडूंमध्ये नसेल. यामध्ये पहिले नाव अर्थात माजी कर्णधार रोहित शर्मा याचे असेल. कारण त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याशिवाय दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यांनी सुद्धा याच फॉर्म्याटमध्ये संन्यास घेतला आहे. या तिघांनी टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.

त्यामुळे हे तीन खेळाडू नवीन संघात नसतील हे तर पक्कं होतं. पण यष्टीरक्षक आणि धमाकेदार खेळाडू ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि सलामीवीर यशस्वी जायसवाल यांना ही नवीन टीममधून डच्चू मिळाला आहे. ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल यांची निवड होणार नाही हे अगोदरच निश्चित मानण्यात येत होते. टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी विश्वचषकासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निश्चय केल्याने जुन्या आणि अनुभवी खेळाडूंना ब्रेक मिळाला आहे.

टी20 वर्ल्ड कप 2026 टीम इंडियात नसलेले गेल्या विश्वचषक संघातील सदस्य

1. रोहित शर्मा

2. विराट कोहली

3. रवींद्र जडेजा

4. ऋषभ पंत

5. मोहम्मद सिराज

6. युजवेंद्र चहल

7. यशस्वी जायसवाल

टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील खेळाडू

सूर्यकुमार यादव (कर्णधार)

ईशान किशन (यष्टीरक्षक)

तिलक वर्मा

हार्दिक पंड्या

शिवम दुबे

अर्शदीप सिंग

हर्षित राणा

कुलदीप यादव

वरुण चक्रवर्ती

जसप्रीत बुमराह

वॉशिंग्टन सुंदर

संजू सॅमसन

अक्षर पटेल

रिंकु सिंह

अभिषेक शर्मा

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.