AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! पगार किती, अर्ज कसा करायचा? वाचा…

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात 'Community Development Officer' या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ते जाणून घेऊयात.

मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! पगार किती, अर्ज कसा करायचा? वाचा...
bmc building
| Updated on: Jun 09, 2025 | 4:03 PM
Share

नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ‘Community Development Officer’ या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी एकूण २९ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी २५ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या नोकरीसाठी पात्रता काय आहे? पगार किती मिळणार? अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वयोमर्यादा काय, पगार किती?

कम्युनिटी डेव्हलमेंट ऑफिसर पदासाठी वयोमर्यदा किमान १८ वर्षे ते कमाल ४३ वर्षे इतकी आहे.यासाठी २५ जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण २९ जागांवर ही भरती होणार असून यासाठी ३० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. तसेच नोकरीचे ठिकाण हे मुंबई हे असणार आहे. त्यामुळे मुंबईतील इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता काय?

कम्युनिटी डेव्हलमेंट ऑफिसर पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर किंवा त्यास समक्षक पदवी लागणार आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, नागरी प्रशासन, शहरी विकास, कम्युनिटी वर्क या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना ही सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तसेच जे उमेदवारांना सामाजिक विकास प्रकल्प, स्थानिक समुदायांसोबत काम करण्याचा अनुभव आहे त्यांच्यासाठी ही खास संधी असणार आहे. तसेच उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा असंही महापालिकेने म्हटलं आहे.

कुठे करायचा अर्ज?

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील ‘Community Development Officer’ या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. २५ जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज उपमुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) कार्यकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका इमारत, ६ वा मजला, पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे,पंतनगर महानगरपालिका यानगृह, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०००७५ या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मुलाखत होणार आहे, मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.