WCR Apprentice Recruitment 2021 : पश्चिम रेल्वेत दहावी पाससाठी बंपर भरती, 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज

| Updated on: Mar 29, 2021 | 5:59 PM

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ wcr.indianrailways.gov.in वर भेट देऊन लॉग इन करावे लागेल. (Bumper Recruitment for 10th Pass in Western Railway, Apply by 30th April)

WCR Apprentice Recruitment 2021 : पश्चिम रेल्वेत दहावी पाससाठी बंपर भरती, 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज
पश्चिम रेल्वेत दहावी पाससाठी बंपर भरती, 30 एप्रिलपर्यंत करा अर्ज
Follow us on

नवी दिल्ली : आपण सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने (डब्ल्यूसीआर) विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थी भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी अर्ज करु इच्छितात, असे पात्र उमेदवार या पदासाठी 30 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ wcr.indianrailways.gov.in वर भेट देऊन लॉग इन करावे लागेल. (Bumper Recruitment for 10th Pass in Western Railway, Apply by 30th April)

एकूण 716 प्रशिक्षणार्थींची भरती

पश्चिम मध्य रेल्वेकडून भरतीद्वारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 716 प्रशिक्षणार्थी पदांची नेमणूक करण्यात येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अर्ज करताना अधिसूचना काळजीपूर्वक वाचली पाहिजे, कारण अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज नाकारला जाईल. याची काळजी घ्या.

या तारखा ठेवा लक्षात

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 26 एप्रिल, 2021
ऑनलाईन अर्ज करण्याती अंतिम तारीख – 30 एप्रिल, 2021

भरतीचा तपशील

इलेक्ट्रीशियन – 135
फिटर – 102
वेल्डर – 43
पेंटर – 75
कारपेंटर – 73
प्लमबर – 58
ब्लॅकस्मिथ – 63
वायरमन – 50
कॉप्युटर प्रोगामिंग अँड कॉप्युटर प्रोगामिंग असिस्टंट – 10
मशिनिस्ट – 5
टर्नर – 2
लॅब असिस्टंट – 2
ड्राफ्टमन – 5

शैक्षणिक पात्रता

रेल्वेने घेतलेल्या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून दहावी उत्तीर्ण केलेली असावी किंवा संबंधित व्यापारातील आयटीआय प्रमाणपत्रासह समकक्ष असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

वयाची मर्यादा किती?

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 15 आणि कमाल वय 24 वर्षे असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय निकषानुसार वयाची सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी फी

पश्चिम मध्य रेल्वेने विविध पदांवर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्वसाधारण उमेदवारांना 170 रुपये शुल्क द्यावे लागेल, तर इतर उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. (Bumper Recruitment for 10th Pass in Western Railway, Apply by 30th April)

इतर बातम्या

मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश, जाणून घ्या मधमाशी पालनातून किती मिळते उत्पन्न

Photo : सोनम कपूरकडून हटके फॅशनसेन्ससह होळीच्या शुभेच्छा, तुम्हीही ट्राय करू शकता हे समर कलेक्शन