मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश, जाणून घ्या मधमाशी पालनातून किती मिळते उत्पन्न

2005-06 च्या तुलनेत देशात मध उत्पादन 242 टक्क्यांनी वाढले आहे. दरवर्षी आपण सुमारे 1.25 दशलक्ष टन मध उत्पादन करत आहोत. (India is one of the five leading countries in the world in honey production)

मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश, जाणून घ्या मधमाशी पालनातून किती मिळते उत्पन्न
मध उत्पादनात जगातील पाच अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश

नवी दिल्ली : शेतीला जोडधंदा म्हणून आता शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मध उत्पादनातून शेतकरी आपले उत्पन्न वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये ‘मीठी क्रांति’चा उल्लेख केला होता. जगातील पाच सर्वात मोठ्या मध उत्पादक देशांमध्ये भारताने आपले स्थान बनवले आहे. याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. शेतकऱ्यांच्याही ही गोष्ट चांगली लक्षात आली आहे. म्हणूनच 2005-06 च्या तुलनेत देशात मध उत्पादन 242 टक्क्यांनी वाढले आहे. दरवर्षी आपण सुमारे 1.25 दशलक्ष टन मध उत्पादन करत आहोत. (India is one of the five leading countries in the world in honey production)

अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कतारसारख्या देशांमध्ये वर्षाकाठी सहाशे कोटी रुपयांहून अधिक मध निर्यात होते. पंतप्रधान म्हणाले की देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच मधमाशी पालनमध्ये सामील व्हावे. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यांच्या जीवनात गोडवा देखील वाढेल. फार्मा क्षेत्र आणि अन्न उद्योगात त्याची मागणी सतत वाढत आहे.

किती झाली निर्यात?

राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या अहवालानुसार भारतात 14,12,659 मधमाशी वसाहतींसह एकूण 9,580 नोंदणीकृत मधमाशा पाळणाऱ्यांची नोंद आहे. प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथरिटी (APEDA) च्या म्हणण्यानुसार, 2019-20 मध्ये भारताने 59,536.75 मेट्रिक टन नैसर्गिक मध निर्यात केले. त्या बदल्यात 3 633.82 कोटी रुपये प्राप्त झाले. तर 2018-19 मध्ये 61,333.88 टन नैसर्गिक मध निर्यात झाले. त्या बदल्यात 732.16 कोटी रुपये मिळाले.

शेतीत आधुनिकता महत्वाची

कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मधमाशा पालनाचे काम फक्त 30,000 रुपयांपासून सुरू करता येते. यामुळे शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मध्ये म्हटले होते की, “आधुनिकता ही भारताच्या कृषी जगातील काळाची मागणी आहे. आपण आधीच खूप वेळ वाया घालवला आहे. कृषी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपारिक शेतीबरोबरच नवीन पर्यायांचा अवलंब करणेही तितकेच महत्वाचे आहे. मधमाशी पालन देखील असाच एक पर्याय म्हणून उदयास येत आहे.

यशाची उदाहरणे

गुरदुम हे दार्जिलिंग, पश्चिम बंगालमधील एक गाव आहे. पर्वतांची उंची, भौगोलिक समस्या असूनही इथल्या लोकांनी मधमाशा पालनाचे काम सुरु केले. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढत आहे. पश्चिम बंगालमधील सुंदरबन्स भागातील नैसर्गिक सेंद्रिय मध तर देशत नव्हे तर जगभरात सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. गुजरातचा बनसकांठादेखील मध उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. हरियाणाच्या यमुना नगरमध्ये मधमाशा पालनाच्या माध्यमातून शेतकरी दरवर्षी कित्येक टन मध उत्पादन करतात. यातून आपण आपले उत्पन्न वाढवित आहोत.

पोळा बदलून अधिक लाभ मिळवता येऊ शकतो

हिमालयन इन्स्टिट्युट ऑफ बायोसॅफ्टी टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, मधमाशा पाळण्यामध्ये वापरल्या जाणार्‍या पारंपारिक पोळ्यामध्ये सुधारणा करून नवीन पोळे विकसित केले गेले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल कारण त्यातून उत्पादन वाढेल. यामधून वर्षातून 35 ते 40 किलो मध मिळू शकते. तर पारंपारिक पोळ्यातून 10 ते 25 किलो मध मिळते. (India is one of the five leading countries in the world in honey production)

इतर बातम्या

Holi 2021 | पडद्यावर होळीची धूम माजवणारे ‘हे’ कलाकार प्रत्यक्षात मात्र रंगांपासून राहतात दूर!

चीनवर कोरोना पसरवल्याचा वारंवार आरोप, आता WHO च्या अहवालात मोठा खुलासा, ड्रॅगनची भूमिका काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI